कन्नड- मराठी भाषावाद पुन्हा उफाळला; 'त्या' गावात कर्नाटकच्या बसचालक व वाहकाला बेदम मारहाण
मराठी- कन्नड भाषावाद पुन्हा उफाळला आहे. आज महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या बेळगावात भाषा न समजल्याच्या भांडणावरुन जमावाने ड्रायव्हर व कंडक्टरवर हल्ला केला. बेळगाव जिल्हा मुख्यालयात बाहेरगावाहून आलेल्या मराठी तरुण-तरुणीला मराठीत उत्तर न दिल्यामुळे हा वाद झाल्याचे सांगितले जाते.

नेमके काय झाले?
बेलागावी तालुक्यातील बालेकुंद्री गावात नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NWKRTC) च्या बसच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरवर प्रवाशांच्या एका गटाने हल्ला केला. कंडक्टरने प्रवाशांना तिकिटे देताना कन्नडमध्ये बोलण्याची विनंती केली. आपल्याला भाषा समजत नाही, असे त्याचे म्हणणे होते. या वरुन वाद झाला.बस बालेकुंद्री येथे पोहोचेपर्यंत २० हून अधिक लोकांच्या जमावाने गाडीवर हल्ला केला. काहींनी गाडीचा रस्ता अडवला. या हल्ल्यात बसचा कंडक्टर महादेव हुक्केरी हे गंभीर जखमी झाले आहेत.
काय म्हणाले कंडक्टर?
कंडक्टर महादेव हुक्केरी यांनी पत्रकारांना घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, बेळगावी येथील सेंट्रल बस टर्मिनल (सीबीटी) येथे एक तरुण मुलगा आणि मुलगी सीबीटी-सुलेभावी बसमध्ये चढले. तिकिटे देताना मुलगी मराठीत बोलत होती. परंतु हुक्केरी यांना ती भाषा समजत नव्हती. म्हणून त्यांनी तिला कन्नडमध्ये बोलण्याची विनंती केली. यामुळे तिच्यासोबत असलेल्या मुलाचा राग आला आणि त्याने कंडक्टरला धमकावण्यास सुरुवात केली. बस बालेकुंद्री येथे पोहोचेपर्यंत २० हून अधिक लोकांच्या जमावाने गाडीवर हल्ला केला. काहींनी गाडीचा रस्ता अडवला. या हल्ल्यात हुक्केरी गंभीर जखमी झाले.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशाने रेकॉर्ड केला. तो चांगलाच व्हायरल झाला आहे. फुटेजमध्ये कंडक्टर आणि ड्रायव्हरला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे दिसून येत आहे. बसचालक खटल मोमीन यांनी असेही सांगितले की, भाषेच्या वादावरून जमावाने त्याला आणि हुक्केरी यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली. दरम्यान, याच व्हायरल व्हिडीओवरुन पोलिस त्यांचा पुढील तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications