मोठी बातमी : दिल्लीतील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी घुसले, 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
नवी दिल्ली : दिल्लीत मुसळधार पावसानंतर जुन्या राजेंद्र नगरमधील कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर इतर अनेक विद्यार्थी पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. गोताखोर आणि एनडीआरएफ बचाव कार्याचे काम सुरु आहे.
दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग इन्स्टिट्यूटच्या लायब्ररीत ही घटना घडली. कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या तीन मुलांचा पाणी साचल्याने मृत्यू झाला. तर अनेकजण बेपत्ता झाल्याची माहीती आहे. या घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, दिल्लीचे मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिवांना या घटनेची चौकशी करून 24 तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव कार्याची माहिती देताना आतिशी म्हणाल्या की, एनडीआरएफ आणि अग्निशमन दल बचाव कार्य सुरु आहे.
यासोबतच दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही घटनास्थळी उपस्थित आहेत. आतिशीने सांगितले की मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या घटनेच्या मॅजिस्ट्रेट चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
Delhi Police registers criminal case in Rajendra Nagar incident where 3 people died
— ANI Digital (@ani_digital) July 28, 2024
Read @ANI Story | https://t.co/QM7SyS2RH0#RajenderNagar #DelhiRains #DelhiPolice pic.twitter.com/NSzsNDdlAx
आतिशी म्हणाल्या, "दिल्लीत संध्याकाळी मुसळधार पावसामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. राजेंद्र नगरमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी तुंबल्याचे वृत्त आहे. दिल्ली अग्निशमन विभाग आणि NDRF घटनास्थळी आहेत.
दिल्लीचे महापौर आणि स्थानिक आमदारही तिथे आहेत. मी दर मिनिटाला घटनेची माहीती घेत आहे. ही घटना कशी घडली याची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला सोडले जाणार नाही."
नालेसफाई न झाल्यामुळे नाल्यातील पाणी तळघरात शिरले असा आरोप विद्यार्थींनी केला आहे.
#WATCH | Old Rajender Nagar incident | Delhi: "MCD says it is a disaster but I would say that this is complete negligence. Knee-deep water gets logged in half an hour of rain. Disaster is something that happens sometimes. My landlord said that he had been asking the councillor… pic.twitter.com/W4fhem3lE6
— ANI (@ANI) July 28, 2024












Click it and Unblock the Notifications