Maithili Thakur : प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर बिहार निवडणुकीत हरली की जिंकली? वाचा सविस्तर
Maithili Thakur : दरभंगा, बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघाचा (Alinagar Assembly Seat) निकाल लागला असून, लोकप्रिय गायिका आणि भाजप उमेदवार मैथिली ठाकूर (वय २५) यांनी मोठा विजय मिळवला आहे. केवळ २५ व्या वर्षी आमदार बनून त्यांनी राज्यातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान पटकावला आहे.

११,७३० मतांच्या फरकाने दिग्गज नेत्याला हरवले
मैथिली ठाकूर यांचा थेट मुकाबला राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) दिग्गज नेते बिनोद मिश्रा (वय ६३) यांच्याशी होता. या लढतीत मैथिली ठाकूर यांनी ११,७३० मतांच्या फरकाने शानदार बाजी मारली.
निकाल तपशील : आकडेवारी / माहिती
- विजेत्या उमेदवार : मैथिली ठाकूर (भाजप)
- मिळालेली मते : ८४,९१५
- पराभूत उमेदवार : बिनोद मिश्रा (राष्ट्रीय जनता दल - RJD)
- मिळालेली मते : ७३,१८५
- मतांचे अंतर : ११,७३० मतांनी विजय
- महत्त्वाचे : बिहारमधील सर्वात तरुण आमदार
केवळ २५ व्या वर्षी झाली आमदार
दरभंगा, बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघाचा निकाल लागला असून, लोकप्रिय गायिका आणि भाजप उमेदवार मैथिली ठाकूर (वय २५) यांनी मोठा विजय मिळवला आहे. केवळ २५ व्या वर्षी आमदार बनून त्यांनी राज्यातील सर्वात तरुण आमदार होण्याचा मान पटकावला आहे. या विधानसभा निवडणुकीतून मैथिली ठाकूर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे.
विजयानंतर मैथिलीची भावनिक प्रतिक्रिया
बंपर विजय मिळवल्यानंतर मैथिली ठाकूर हिने आपला आनंद व्यक्त केला. "हा एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते. ही अलीनगरच्या जनतेचा विजय आहे. मी निशब्द आहे." असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ती पुढे म्हणाली, "लोकांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. आमदार म्हणून हा माझा पहिला कार्यकाळ असेल आणि मी माझ्या मतदारसंघासाठी माझे सर्वोत्तम योगदान देईन. जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याची मला आशा आहे."
मैथिली ठाकूर हिने या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, तसेच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त केले.
-
भारतातील एलपीजी दरवाढ : धोरणात्मक अपयश की जागतिक ऊर्जा धक्क्याचा परिणाम?, वाचा विश्लेषण! -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास









Click it and Unblock the Notifications