Mahavir Jayanti 2025 wishes: महावीर जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा खास मराठीत शुभेच्छा संदेश
Mahavir Jayanti 2025 wishes : दरवर्षी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी जैन धर्माचे अनुयायी महावीर जयंती साजरी करतात. महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा एक प्रमुख सण आहे. या दिवशी जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म झाला. मान्यतेनुसार त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला बिहारमधील कुंडा गावात झाला. यावर्षी तिथीनुसार भगवान महावीर जयंती 10 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
या दिवशी भगवान महावीरांना सोन्या-चांदीच्या भांड्यांनी अभिषेक केला जातो. जैन मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि विधी असतात. सकाळी मिरवणुका आणि रॅली काढली जाते. दानधर्म करा. जैन लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

भगवान महावीरांनी त्यांच्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अविश्वास आणि क्षमा यावर सर्वाधिक भर दिला. त्याग आणि संयम, प्रेम आणि करुणा, नैतिकता आणि सद्गुण हे त्यांच्या प्रवचनांचे सार होते. त्यांनी आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांची शिकवण आजही जीवन शांत, संयमी आणि यशस्वी करण्याचा मार्ग दाखवते. या पवित्र दिवशी आपल्या नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवा खास मराठीत शुभेच्छा संदेश
जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन
महावीर जयंतीच्या शुभेच्छा ...!

अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांना
विनम्र अभिवादन आणि महावीर जयंतीच्या शुभेच्छा ...!
रागावर शांतीने विजय मिळवा
दृष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा
असत्यावर सत्यांनी विजय मिळवा
महावीर जयंतीच्या शुभेच्छा ...!

प्रत्येक आत्मा स्वतःमध्ये सर्वज्ञ आणि आनंदी आहे.
आनंद बाहेरून येत नाही, तो माणसात असतो.
महावीर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा...!
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...!
आचार्यांची संगत सिद्धांचे सार
संतांची साथ,अहिंसेचा प्रचार
हेच भगवान महावीर यांच्या जीवनाचे सार
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ...!
अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
खूप खूप शुभेच्छा ...!

कोणतीही हिंसा आणि नकारात्मकता
तुम्हाला स्पर्श करू शकत नाही
सुसंवादी जीवन जगण्यासाठी
तुम्हाला नेहमी भरपूर संधी मिळू दे.
महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...!
वास्तविक शत्रू तुमच्या आत आहे
तो शत्रू राग,गर्व, लोभ,आणि द्वेष च्या रुपात आहे
या शत्रूंवर विजय मिळवूया
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊया!


Click it and Unblock the Notifications