महात्मा फुले जयंती : पीएम मोदींचं मोठ्ठ गिफ्ट; 'त्या' मतदारसंघाला दिले ४ हजार कोटी, नेमकं काय केलं?
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर नारीशक्तीसाठी काम केलं. महिलांच्या हितासाठी व त्यांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलं. फुलेंचा विचार व त्यांचा संकल्प पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयंतीनिमित्त त्यांचा गौरव केला. पीएम मोदी यांनी आज त्यांच्या वाराणसी मतदारसंघाचा दौरा केला. याच दौऱ्यात त्यांनी ३९०० कोटी रुपयांच्या सुमारे ४४ विकास कामांचे भूमिपुजन व लोकार्पण केले.

काय म्हणाले मोदीजी?
महात्मा ज्योतीराव फुले यांची आज जयंती आहे. महात्मा फुलेंसारख्या त्यागी, तपस्वी महापुरुषांकडून प्रेरणा घेऊनच आम्ही देशसेवेचा मंत्र जपत आहोत. सबका साथ, सबका विकास हा मंत्र आम्ही त्यांच्याकडूनच घेतला, असा उल्लेख पीएम मोदी यांनी आज वाराणसीतील कार्यक्रमात केला. महात्मा फुले यांनी सुरु केलेली महिला सशक्तीकरणाची चळवळ आम्ही पुढे नेत आहोत, असेही मोदींनी आवर्जून सांगितले.
सबका साथ, सबका विकास
पंतप्रधान मोदी म्हणाले, "महात्मा फुलेंसारख्या महान तपस्वी आणि निस्वार्थी पुरुषांनी प्रेरित होऊन राष्ट्राची सेवा केली. त्यांचा हाच मंत्र आम्ही पुढे नेत आहोत. देशासाठी 'सबका साथ, सबका विकास' या कल्पनेने आपण पुढे जात आहोत. तो मंत्र महात्मा फुलेंकडून आम्ही घेतला. मी आमच्या कष्टाळू बहिणींचे विशेष अभिनंदन करतो. या बहिणींनी दाखवून दिले आहे की जर विश्वास ठेवला तर तो विश्वास नवीन इतिहास घडवतो.
काशीत चार हजार कोटींची कामे
वाराणसी दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे ३९०० कोटींच्या ४४ विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण केले. मागच्या १० वर्षांत वाराणसीने विकासाची गती पाहीली, असा उल्लेखही मोदींनी केला. ते म्हणाले, आज काशी हे फक्त एक पुरातन शहर नाही तर एक प्रगतीशिल शहरही बनले आहे. काशीमध्ये काही दिवसांपूर्वी १९ वर्षीय मुलीवर २३ जणांनी सहा दिवस बलात्कार केला होता. त्यापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबतही मोदींनी पोलिस आयुक्त, मंडल आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याचे निर्देश दिले.












Click it and Unblock the Notifications