Maha Shivratri 2025 : महाशिवरात्री कधी आहे ? पूजा, विधी, तिथी आणि शुभ मुहूर्ताची वेळ, घ्या जाणून
Maha Shivratri 2025 Kadhi Aahe: शिवभक्त महाशिवरात्रीची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. असं म्हटलं जाते की या दिवशी महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख मिळते. हा दिवस खूप पवित्र आहे, या दिवशी लोक भगवान शिवासाठी उपवास करतात आणि शिवलिंगावर जल अर्पण करतात.
भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे लग्न याच दिवशी झाले होते, असं असं मानलं जातं. परंतु यावेळी त्याच्या तारखेबद्दल थोडा गोंधळ आहे, काही लोक म्हणत आहेत की, हा व्रत 26 फेब्रुवारी रोजी ठेवला जाईल तर काही लोकांचं म्हणणं आहे की, हा व्रत 27 फेब्रुवारी रोजी असेल. तर चला मग हा तुमचा गोंधळ दूर करूया.

पंचांगानुसार महाशिवरात्रीचे व्रत फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला पाळले जाते, जे २६ फेब्रुवारी रोजी सकाळी 11:08 वाजता सुरू होईल. तर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजता संपेल, म्हणून महाशिवरात्री फक्त 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल.
महाशिवरात्रीच्या उत्सवाबद्दल विविध कथा प्रचलित आहेत. या दिवसाकडे शिव-पार्वतीच्या मिलनाचा उत्सव म्हणून पाहिले जाते, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की, या दिवसाला विश्वाची सुरुवात म्हणून देखील पाहिले जाते.
भगवान शिव यांनी तांडव नृत्य केलं होतं
काही कथांमध्ये असं म्हटलं आहे की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांनी विश्वाच्या कल्याणासाठी तांडव नृत्य सादर केले होते. तर स्कंद पुराणानुसार या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते. या कारणास्तव भक्त या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा करतात.
महाशिवरात्रीची पूजा पद्धत
-सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि उपवास करण्याचा संकल्प करा.
-शिवलिंगावर दूध, पाणी, मध, दही, तूप, गंगाजल आणि पंचामृत यांचा अभिषेक करा.
-भगवान शिव यांना बिल्वपत्र खूप आवडते, म्हणून त्यांना बिल्वपत्र अर्पण करा.
-दिवा लावा आणि भगवान शिवाची आरती करा.
- "ॐ नमः शिवाय" हा मंत्र जप करा.
महाशिवरात्रीचे महत्त्व
- या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.
- महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीला मोक्ष मिळतो.
- शिवाची पूजा केल्याने घरात आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येते.
-असं मानलं जातं की जर अविवाहित लोक या दिवशी उपवास करतात तर त्यांना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळतो.
DISCLAIMER: ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहीती आणि श्रद्धेवर आधारित आहे. वनइंडिया मराठी या लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही. कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यासाठी, ज्योतिषी आणि पंडित यांचा सल्ला घ्या.












Click it and Unblock the Notifications