Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

JEE Result 2025 ! महाराष्ट्राच्या विषाद जैनला 100 पैकी 100; कसा पहायचा निकाल? वाचा सविस्तर

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ने आज जेईई मेन- २०२५ सत्-र १ चा निकाल जाहीर केला. त्यात महाराष्ट्राच्या विषाद जैनला १०० पैकी १०० गुण मिळाले. विषादसह देशभरातील आणखी १३ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. हा निकाल jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

JEE Result 2025

राजस्थान आघाडीवर

या वर्षी जेईई मेन सत्-र १ मध्ये १४ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवले. त्यात राजस्थान आघाडीवर राहिले. राजस्थानचे पाच विद्यार्थ्यांनी टॉपर्स म्हणून चमकले. जेईई मेन २०२५ परिक्षेची अंतिम उत्तरपत्रिका निकालाच्या एक दिवस आधी म्हणजे काल प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये विविध शिफ्टमधील १२ प्रश्न वगळण्यात आल्याची पुष्टी करण्यात आली. एनटीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या प्रश्नांसाठी सर्व उमेदवारांना पूर्ण गुण देण्यात आले.

निकाल कसा तपासायचा?

- jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
- सत्र १ च्या स्कोअरकार्ड डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि लॉग इन करा.
- तुमचा निकाल पहा आणि डाउनलोड करा.

जेईईचे टॉपर्स

१०० टक्के गुण मिळवणारे १४ उमेदवार खालीलप्रमाणे आहेत:

आयुष सिंघल, राजस्थान
कुशाग्र गुप्ता, कर्नाटक
दक्ष, दिल्ली (एनसीटी)
हर्षम्झा, दिल्ली (एनसीटी)
रजित गुप्ता, राजस्थान
श्रेयस लोहिया, उत्तर प्रदेश
सक्षम जिंदल, राजस्थान
सौरव, उत्तर प्रदेश
विषाद जैन, महाराष्ट्र
अर्णव सिंह, राजस्थान
शिवेन विकास तोष्णीवाल, गुजरात
साई मनोग्ना गुठीकोंडा, आंध्र प्रदेश
ओम प्रकाश बेहरा, राजस्थान
बानी ब्रता माझी, तेलंगणा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+