Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahakumbh 2025: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगमात पवित्र स्नान केले, सूर्यदेवाची केली पूजा

President Droupadi Murmu Mahakumbh Mela Prayagraj News : महाकुंभ केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आकर्षणाचे एक प्रमुख केंद्र बनले आहे. संगममध्ये आतापर्यंत 50 कोटींहून अधिक लोकांनी स्नान केले आहे. व्हीव्हीआयपी देखील सतत पवित्र स्नान करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर सोमवारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही प्रयागराज येथे पोहोचून संगमात पवित्र स्नान केलं आहे. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित होते.

president droupadi murmu

या काळात त्याची भावनिक बाजू दिसून आली. पांढरे कपडे घालून त्यांनी संगमात पवित्र स्नान केलं आहे. त्यानंतर त्या सूर्यदेवाची पूजा करताना दिसल्या. या काळात त्या पूर्णपणे भावनिकदृष्ट्या धर्माला समर्पित दिसल्या आहेत. यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिवेणी संगम येथे पक्ष्यांना अन्न दिलं. यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी राष्ट्रपतींसोबत महाकुंभाच्या खास मुद्द्यांवर चर्चा केली. राज्यपाल आनंदीबेन पटेल देखील उपस्थित होत्या.

यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली. संगमावर उपस्थित असलेले लोक राष्ट्रपतींची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक दिसत होते. आजही येथील संगमात मोठ्या संख्येने लोक स्नान करत आहेत. संगमकडे जाण्यासाठी लांब रांगा आहेत. आज पहाटे 3 वाजल्यापासून पवित्र स्नान सुरू आहे. राष्ट्रपतींनी महाकुंभाच्या संपूर्ण आयोजनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे कौतुक केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+