महाकुंभमेळा परिसरातील पंडालमध्ये पुन्हा आग, अग्निशमन दलाच्या दाखल, आग नियंत्रणात

Prayagraj MahaKumbh : प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात गुरुवारी पुन्हा एकदा आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. शंकराचार्य मार्गावरील सेक्टर 18 जवळ ही आगीची घटना घडली. आरएएफ जवान, यूपी पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

शंकराचार्य मार्गावरील सेक्टर 18 वरील हरिहरानंद कॅम्पमध्ये ही आग लागली होती. मात्र आता अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

prayagraj fire

मिळालेल्या माहितीनुसार शंकराचार्य मार्गावरील सेक्टर-18 मध्ये आग लागली. यादरम्यान पंडालवरही परिणाम झाला. अग्निशमन विभागाला तात्काळ आगीची माहिती देण्यात आली आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमागील कारण अद्याप स्पष्ट आहे. यावेळी छावणीत उपस्थित असलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

या आगीच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये पंडालमधून धूर निघताना दिसत आहे. त्याच वेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. सीएफओचा म्हटलं आहे की याठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची ही तिसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 2025 च्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे 40 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. या काळात 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 39.74 कोटी भाविकांनी संगमात स्नान केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+