Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ विक्री विकणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यात महिला यात्रेकरू स्नान करतानाचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट आणि विक्री करणाऱ्या दोन सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक मेळाव्याशी संबंधित दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह सोशल मीडियावरील सामग्रीविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश पोलिस प्रमुख प्रशांत कुमार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

एका निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे की, सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमला अशी काही माहिती आढळून आली की, कुंभमेळ्यात महिलांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ अपलोड करत आहेत. जे त्यांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे स्पष्ट उल्लंघन आहे. यानंतर कोतवाली कुंभमेळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

mahakumbh 2025

17 फेब्रुवारी रोजी महिला यात्रेकरूंचे आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एका इन्स्टाग्राम अकाउंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अकाउंट ऑपरेटरची ओळख पटविण्यासाठी इंस्टाग्रामची मालकी आणि संचालन करणाऱ्या तंत्रज्ञान गट मेटाकडून याबाबतची माहिती मागवली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 19 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणात एका टेलिग्राम चॅनेलवर असेच व्हिडिओ विक्रीसाठी ऑफर केल्याचे आढळले. निवेदनात म्हटले आहे की, चॅनेलविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून पुढील चौकशी पोलिस करत आहेत.

आतापर्यंत सुमारे 1.7 कोटी भाविकांनी महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला आहे. हा उत्सव त्याच्या आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखला जातो. देश-विदेशातील लोक येथे पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करत आहेत.

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर

इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा कुंभमेळ्याशी संबंधित सामग्रीवर सक्रियपणे लक्ष ठेवून आहे. कोणत्याही अनुचित किंवा आक्षेपार्ह सामग्रीवर त्वरित लक्ष दिले जाईल याची खात्री करण्यासाठी ते स्थानिक अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहेत. या सहकार्याचा उद्देश कार्यक्रमाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य राखणे आहे.

कुंभमेळ्यात सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जातं आहे. प्रचंड गर्दीला तोंड देण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात केले जात आहेत. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पाळत ठेवणारी यंत्रणा काम करत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+