Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गौतम अदानी यांची प्रयागराज आणि इस्कॉनला भेट, सेवा आणि अध्यात्माचे मिश्रण

Gautam Adani Maha Kumbh 2025: प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी मंगळवारी आज (ता.21) रोजी महाकुंभात सहभागी झाले आहेत. गौतम अदानी आज प्रयागराज महाकुंभात पोहोचले आहेत. अदानी यांनी प्रथम महाकुंभमेळा परिसरातील इस्कॉन सेवा शिबिराला भेट दिली. अदानी समूह आणि इस्कॉनच्या सहकार्याने दररोज एक लाखाहून अधिक भाविकांना मोफत जेवण देत आहे. इस्कॉनला भेट दिल्यानंतर गौतम अदानी त्रिवेणी संगमात गेले आणि त्यांनी प्रार्थना केली. या पवित्र ठिकाणी अदानी यांनी त्यांचे कुटुंब आणि देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दरम्यान, अदानी यांनी भारतातील 16 प्रसिद्ध हनुमान मंदिरांपैकी एक असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिराला भेट दिली. अदानी यांनी गीता प्रेस कॅम्पलाही भेट दिली. अदानी ग्रुप गीता प्रेसच्या सहकार्याने एक कोटी 'आरती संग्रह' मोफत वाटप करत आहेत. एवढेच नाही तर गौतम अदानी यांनी कुंभमेळा परिसर स्वच्छ करण्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी हितगुज साधले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे महाकुंभात चांगली स्वच्छता दिसून येत आहे.

MahaKumbh Mela 2025

महाकुंभात उपस्थिती लावून गौतम अदानी यांनी श्रद्धा आणि धर्माकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मांडला आहे. गौतम अदानी यांचा हा प्रवास एकता, पवित्रता आणि सेवेप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. गौतम अदानी यांनी महाकुंभाचे वर्णन भारतीय संस्कृतीचा एक भव्य यज्ञ म्हणून केले आहे. महाकुंभाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने इस्कॉन आणि गीता प्रेसच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी अदानी ग्रुप इस्कॉन आणि गीता प्रेसच्या सहकार्याने महाकुंभाला येणाऱ्या भाविकांची सेवा करत आहे.

इस्कॉन आणि गीता प्रेस या दोन्ही संस्था भारतीय धर्म आणि संस्कृतीचा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. महाकुंभात धार्मिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडण्याचे एक नवीन उदाहरण म्हणून अदानी समूहाचे या दोन संस्थांशी असलेले संबंध उदयास आले.

अदानी ग्रुपकडून महाकुंभात दररोज लाखो भाविकांना मोफत जेवण

अदानी ग्रुप महाकुंभात भाविकांना मोफत जेवणही देत ​​आहे. यासाठी कंपनीने इस्कॉनसोबत भागीदारी केली आहे. अदानी ग्रुप आणि इस्कॉनच्या सहकार्याने 'महाप्रसाद' सेवेद्वारे दररोज एक लाख लोकांना मोफत जेवण देत आहे. अदानी समूहाने महाकुंभात 50 लाख भाविकांसाठी महाप्रसाद सेवेचे काम 13 जानेवारीपासून सुरु केलं आहे ते 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

MahaKumbh Mela 2025

गौतम अदानी आज इस्कॉनच्या सेवा शिबिरात पोहोचले. याठिकाणी त्यांनी स्वतःच्या हातांनी भाविकांना जेवण दिले. गौतम अदानी यांनी इस्कॉन चालवणाऱ्या स्वयंपाकघरालाही भेट दिली, जिथे महाप्रसाद तयार केला जातो. अदाणी यांनी स्वयंपाक घरातील सर्व तयारीचा आढावाही घेतला. इस्कॉनने जत्रेच्या परिसरात आणि बाहेर महाप्रसाद तयार करण्यासाठी दोन स्वयंपाकघरे तयार केली आहेत. त्याच वेळी जत्रा परिसरात 40 ठिकाणी भाविकांना महाप्रसाद सेवा दिली जात आहे. भक्तांची सेवा करणे म्हणजे गंगा मातेची सेवा करणे. सेवा ही साधना आहे आणि खऱ्या मनाने केलेली सेवा थेट देवापर्यंत पोहोचते, असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला आहे.

गीता प्रेसच्या सहकार्याने अदानी ग्रुपकडून एक कोटी 'आरती संग्रह' चे वाटप

महाकुंभमेळ्यात भाविकांना 'आरती संग्रह'च्या एक कोटी मोफत प्रती अदानी ग्रुप वाटणार आहे. त्यासाठी कंपनीने गीता प्रेस आणि अदानी समूह संयुक्तपणे हे काम करत आहे. गीता प्रेसने प्रकाशित केलेला 'आरती संग्रह' हा भक्तीगीतांचा संग्रह असेल. गीता सारच्या पाच लाख प्रतीही वाटल्या जाणार आहेत. गौतम अदानी यांच्या या उपक्रमाकडे सनातन साहित्य सेवेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

आज मंगळवारी गौतम अदानी यांनीही महाकुंभातील गीता प्रेस कॅम्पला भेट दिली. गौतम अदानी यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, गीता प्रेस 100 वर्षांपासून सनातन आणि साहित्याच्या माध्यमातून भारताची सेवा करत आहे आणि महाकुंभात सनातन आणि साहित्याची सेवा करण्याचा विचार केला तर गीता प्रेसपेक्षा चांगले कोण असू शकते.

महाकुंभात अदानी समूहाची इलेक्ट्रिक वाहने देखील मोफत सेवा देत आहेत

अदानी ग्रुपने भाविकांच्या सोयीसाठी अनेक व्यवस्था केल्या आहेत. ज्यामध्ये हिरव्या गोल्फ कार्टचा समावेश आहे. म्हणजेच वृद्ध, अपंग आणि लहान मुलांसह असलेल्या मातांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. भाविकांना संगमात ये-जा करण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या हिरव्या गोल्फ कार्टचा वापर करण्यात आला आहे.

गौतम अदानी यांची महाकुंभ यात्रा आध्यात्मिक भक्ती आणि व्यावहारिक सेवेचे मिश्रण दर्शवते, जी भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांना पाठिंबा देण्याची त्यांची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. महाप्रसाद सेवा, गीता प्रेस सहकार्य आणि स्वच्छता राखण्याच्या प्रयत्नांसारख्या उपक्रमांद्वारे, अदानी समूहाच्या योगदानाने आध्यात्मिक आणि मानवतावादी प्रयत्न म्हणून महाकुंभाचे सार बळकट केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+