Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mahakumbh 2025: 'महाकुंभ मेळ्यात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 10 कोटींपेक्षा जास्त'

MahaKumbh Mela 2025 : महाकुंभ मेळा 2025 ला 13 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभासाठी अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलं आहे. या पवित्र महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये भक्त, संत आणि साधूंचा मेळावा पाहायला मिळत आहे. लाखो भाविक दररोज त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी येत आहेत.

उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार महाकुंभमेळ्यादरम्यान 10 कोटींहून अधिक यात्रेकरूंनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले आहे. गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांचा हा संगम भारतभर आणि परदेशातील भाविकांना आकर्षित करत आहे.

mahakumbh Mela 2025

फोटो सौजन्य- पीटीआय

विक्रमी उपस्थिती

गुरुवारी दुपारपर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून दिलेल्या माहीतीनुसार दररोज लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात आणि विशेष स्नान उत्सवांमध्ये ही संख्या कोटींपर्यंत पोहोचते. "गुरुवारी दुपारी 12 वाजता 10 कोटींचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. जो सध्या सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे."

योगी आदित्यनाथ प्रशासनाचा अंदाज होता की यावर्षी महाकुंभात 45 कोटींहून अधिक लोक उपस्थित राहतील. भाविकांमध्ये उत्साह आहे आणि बरेच लोक पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात आहेत. "फक्त गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत 30 लाख लोकांनी संगमात स्नान केले, यामध्ये 10 लाख 'कल्पवासी' आणि इतर भाविकांचा समावेश होता."

प्रयागराजमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी

प्रयागराजमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी असूनही जनजीवन सुरळीत सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने फक्त मोठ्या स्नानाच्या दिवशीच निर्बंध घातले आहेत. शाळा, कार्यालये आणि व्यवसाय सामान्यपणे सुरू आहेत. यामुळे दैनंदिन कामांमध्ये कमीत कमी व्यत्यय येतो आणि त्याच वेळी मोठ्या गर्दीला सामावून घेता येते.

महोत्सवातील ठळक वैशिष्ट्ये

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुमारे 3.5 कोटी यात्रेकरूंनी स्नान केले. याशिवाय पौष पौर्णिमेला 1.7 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. या कार्यक्रमांमधून महाकुंभाच्या उत्सवातील या सणांचे महत्त्व अधोरेखित होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+