मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्याला जाण्याचा प्लॅन आहे ? नवीन नियम आणि तयारी काय आहे ते जाणून घ्या
Mahakumbh 2025 Mauni Amavasya: महाकुंभमेळा 2025 ला 13 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. या पवित्र महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये भक्त, संत आणि साधूंचा मेळावा पाहायला मिळत आहे. लाखो भाविक दररोज त्रिवेणी संगम येथे स्नान करण्यासाठी येत आहेत. जर तुम्ही मौनी अमावस्येच्या पवित्र प्रसंगी महाकुंभमेळ्याला उपस्थित राहण्याचा प्लॅन करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात.
या वर्षी 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी 8-10 कोटी भाविक प्रयागराजच्या संगम शहरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. या प्रचंड गर्दीला हाताळण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

संपूर्ण मेळा परिसर 'नो व्हेईकल-नो व्हीआयपी झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही प्रकारच्या वाहनाला नियुक्त केलेल्या पार्किंग क्षेत्राबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. या खास दिवशी कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल देखील मान्य केला जाणार नाही. याशिवाय पवित्र संगम आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेसाठी कडक देखरेख ठेवली जाणार आहे. भाविकांची वाहतूक एकेरी ठेवण्यासाठी पोंटून पुलांवर काही विशेष नियम लागू होऊ शकतात.
महाकुंभमेळ्यादरम्यान मौनी अमावस्येला 13 प्रमुख आखाड्यांच्या साधूंसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शाही स्नान आणि अमृत स्नानादरम्यान आखाड्यांना प्राधान्य दिले जाईल. या भागात प्रवेश करण्यासाठी भाविकांना आगाऊ जागा बुक कराव्या लागतील कारण शेवटच्या क्षणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
ट्रेन आणि प्रवास व्यवस्था
भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने रेल्वेच्या सहकार्याने रेल्वे आणि प्रवास व्यवस्थेसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. प्रयागराजच्या 9 रेल्वे स्थानकांवर 150 विशेष गाड्या चालवल्या जातील. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून दर 4 मिनिटांनी एक ट्रेन उपलब्ध असेल.
अयोध्या, वाराणसी आणि इतर धार्मिक स्थळांवरील गर्दीचा अंदाज
मौनी अमावस्येदरम्यान केवळ प्रयागराजमध्येच नव्हे तर अयोध्या, वाराणसी आणि मिर्झापूरसारख्या धार्मिक स्थळांवरही मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात ७.४१ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, तर मौनी अमावस्येच्या दिवशी ही संख्या चार पट वाढू शकते.
गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा
गर्दी व्यवस्थापन आणि सुरक्षा चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. संगम आणि आजूबाजूच्या परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष ठेवले जाईल आणि पोलिस, बचाव पथके आणि वैद्यकीय कर्मचारी नेहमीच तैनात असतील.
संगममध्ये डुबकी मारल्यानंतर अनुपम खेर भावुक
22 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. त्यावेळी अनुपम खूप भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. हा क्षण त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करताना त्यांनी या प्रसंगाचे आध्यात्मिक महत्त्व सांगितलं आहे. तसेच त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक क्षण असल्याचं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
महाकुंभ में गंगा स्नान करके जीवन सफल हुआ !! पहली बार उस स्थान पर पहुँच के मंत्र उच्चारण किए जहाँ माँ गंगा, जमुना जी और सरस्वती जी का संगम होता है! प्रार्थना करते करते अश्रु स्वयं ही आँखो से बहने लगे।संयोग देखिए! ऐसा ही ठीक एक साल पहले आज ही के दिन अयोध्या में प्राण प्रतिष्ठान के… pic.twitter.com/MGLBg3XoE7
— Anupam Kher (@AnupamPKher) January 22, 2025
प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स
तुमचा स्लॉट आगाऊ बुक करा: संगम आणि आखाड्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी आगाऊ स्लॉट बुक करणे आवश्यक असेल.
तुमच्या वाहनाची काळजी घ्या: वाहनांसाठी जागा नसल्याने तुम्हाला पार्किंग क्षेत्रातून चालत जावे लागेल.
ट्रेनचे वेळापत्रक तपासा: जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर वेळेवर पोहोचण्यासाठी आधीच नियोजन करा.
सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करा: प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करा. जेणेकरून तुमचा प्रवास आनंददायी आणि सुरक्षित होईल.












Click it and Unblock the Notifications