Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाकुंभातील शेवटचे शाहीस्नान कधी?, 26 की 27 फेब्रुवारीला आहे मुहूर्त, जाणून घ्या त्याविषयी सर्व काही

Mahakumbh 2025 last bath in Mahakumbh : प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून सुरू झालेल्या महाकुंभाचा समारोप आता जवळच आलेला आहे. त्यातच महाकुंभातील पवित्र स्नानसाठी देशभरातून लोक संगमात डुबकी मारण्यासाठी येत आहेत. कारण, प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा संगम झालेला असून या ठिकाणी यंदा मोठा उत्सव सुरू आहे.

महाकुंभ काळात शाहीस्नान व अमृत स्नानाला महत्त्व असते. संगमान डुबकी लावल्याने अनेक गोष्टींचा लाभ होतो, अशी हिंदूंची धारणा आहे. महाकुंभातील शाही, अमृत स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया की, महाकुंभातील शेवटचे स्नानाचा मुहूर्त कधी आहे. त्याचे महत्त्व किती असते, वाचा सविस्तर..!

Maha Kumbh 2025

महाकुंभातील शेवटचे स्नान कधी?

महाकुंभातील शेवटच्या स्नानाविषयी हिंदू कॅलेंडरनुसार माहिती देण्यात आलेली आहे. चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होईल. त्याचवेळी, ही तारीख 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजून 54 मीनिटांनी संपणार आहे. कॅलेंडरनुसार, महाशिवरात्रीचा उत्सव 26 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी, महाकुंभमेळ्याच्या समारोपासह, या महान उत्सवाचे शेवटचे स्नान देखील केले जाणार आहे.

महाकुंभातील शेवटच्या अमृत स्नानाचे महत्त्व काय?

हिंदू धर्मात महाकुंभातील अमृत स्नानाचे खूप महत्त्व आहे. प्रयागराजच्या पवित्र भूमीत गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर हा पवित्र स्नान विधी पार पडणार आहे. येथे जगभरातील भाविक पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी एकत्र येतील. त्रिवेणी येथे अमृत स्नान केल्याने शरीरासह आत्म्याचेही शुद्धीकरण होते, अशी धारणा भाविकांची आहे. त्यासोबतच आध्यात्मिक ज्ञानही मिळते.

स्नानाचा शेवटचा दिवस अन् महाशिवरात्री योग

एकीकडे महाकुंभातील शेवटचे स्नान हे 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. तर दुसरीकडे या दिवशी महाशिवरात्रीचा शुभ संयोग त्यामुळे हा आणखी दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. कारण हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे. महाकुंभातील हा उत्सव अमृत स्नानाची ऊर्जा आणखी वाढवत आहे. ज्यामुळे भाविकांना मोठे पुण्य लाभणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+