पंतप्रधान मोदींना भेटलेल्या गेमरने त्रिवेणी संगमात केलं पवित्र स्नान, कोण आहे पायल धरे?
Gamer Payal Dhare: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील भाविक संगमात पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या भक्ती-भावने येत आहेत. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या पायल धरे हीने सुध्दा त्रिवेणी संगमावर जाऊन पवित्र स्नान केलं आहे.
पायल धरेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर खूप लोकप्रियता मिळवणारी पायल धरे कोण आहे ते जाणून घेऊया ?

गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली लोकप्रिय गेमर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पायल धरे हीने प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच तिने एक फोटो ही शेअर केला आहे. पायलने फोटोला कॅप्शनमध्ये 'महाकुंभ'असं लिहिलं आहे.
कोण आहे पायल धरे?
पायल धरे ही देशातील सर्वात लोकप्रिय महिला गेम निर्माती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. पायल ही मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा जिल्ह्यातील उमरानाला गावची रहिवासी आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पायल धरेने 'गेमिंग क्रिएटर ऑफ द इयर' पुरस्कार जिंकला होता. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करताना दिसतेय.
मध्य प्रदेशातील पायल धरे ही सर्वात लोकप्रिय महिला गेम निर्मात्यांपैकी एक आहे. ती तिच्या YouTube आणि Instagram हँडल (payalgamingg) द्वारे गेमिंग कंटेंट शेअर करते. तिचे सध्या इंस्टाग्रामवर 3.7 दशलक्ष (37 लाख) पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी पायल धरे हीने भेट घेतली होती. त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये तिच्या लोकप्रियतेचा आलेख आणखी वाढला. गेमिंग आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. गेमिंग उद्योगाचे महत्त्व समजून घेऊन पंतप्रधान मोदींनी पायल धरे सारख्या गेमर्सना पाठिंबा दिला आणि त्यांना प्रेरणा दिली.
जगातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम
13 जानेवारी रोजी सुरू झालेला महाकुंभ 26 फेब्रुवारी रोजी संपेल. मानवी इतिहासात एकाच ठिकाणी लोकांचा जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. आतापर्यंत 50 कोटींहून अधिक भाविकांनी यात सहभाग घेतला आहे.












Click it and Unblock the Notifications