Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंजाब: लुधियानाचे आप आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू, पोलिस तपास सुरु

Punjab News: पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे शुक्रवारी डोक्याला गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास गोगीच्या डोक्यात गोळी लागली आहे . त्यांना रुग्णालयात नेण्यात असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डीसीपी जसकरण सिंह तेजा म्हणाले की, कुटुंबातील सदस्यांच्या मते, त्याने चुकून स्वतःवर गोळी झाडली. त्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. घटनेनंतर त्याचा मृतदेह डीएमसी रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. शनिवारी पोस्टमॉर्टम केले जाणार आहे.

mla gurpreet gogi

2022 मध्ये आम आदमी पक्षात सहभागी

गुरप्रीत गोगी हे 2022 मध्ये आम आदमी पक्षात सामील झाले होते. त्यांनी दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले भारत भूषण आशु यांचा पराभव करून लुधियाना येथून विधानसभा निवडणूक जिंकली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार गोगीचा मृत्यू गोळी लागल्याने झाला, परंतु त्यांना कोणत्या परिस्थितीत गोळी लागली हे पोलिसांनी सांगितले नाही. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण माहिती शेअर केली जाईल, असं पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान गोगी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच त्यांचे समर्थक डीएमसी रुग्णालयाबाहेर जमू लागले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. तथापि, पोलिस अधिकाऱ्यांनी घटनेबद्दल अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

'आप' नेत्यांकडून शोक व्यक्त

गुरप्रीत गोगी यांच्या निधनाबद्दल आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अमृतसर पूर्व येथील आप आमदार जीवन ज्योत कौर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "ही घटना केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीय देखील आहे. आमचे सहकारी आमदार गुरप्रीत गोगी आता आपल्यात नाहीत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+