LPG Rate : खूशखबर.. गॅस सिलेंडर झाला स्वस्त! आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन दर
LPG Rate : चैत्र महिन्याची सुरुवात खूप चांगली झाली आहे, गुढीपाडव्याची धूम तर होतीच पण त्यानंतर आता चैत्र नवरात्रीत केंद्र सरकारने एख मोठी भेट दिली आहे. LPG सिलेंडर आता स्वस्त झाला आहे.
1 एप्रिल रोजी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर 41 रुपयांनी स्वस्त झाला आहे, त्यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 1762 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे दर महिन्याला गॅसचे दर बदलतात, आजपासून नवीन किंमती देखील लागू झाल्या आहेत.

कालपर्यंत दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1803 रुपये होती. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतला जातो. मार्च महिन्यात हा सिलिंडर 6 रुपयांनी महागला होता, तर फेब्रुवारीमध्ये तो 7 रुपयांनी कमी झाला होता.
घरगुती सिलेंडरचे दर किती?
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही आणि त्याचे दर स्थिर आहेत ही दिलासादायक बाब आहे. आता देशातील चार महानगरांमध्ये 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत खालीलप्रमाणे आहे (LPG Rate)
- दिल्ली - 1762 रुपये
- मुंबई - 1713.50 रुपये
- कोलकाता - 1868.50 रुपये
- चेन्नई - 1921.50 रुपये
4 महानगरांमध्ये घरगुती LPG सिलिंडरची किंमत किती (LPG Rate)
- दिल्लीमध्ये LPG सिलिंडरची किंमत 882 रुपये
- मुंबईत LPG सिलिंडरची किंमत 802.50 रुपये
- कोलकातमध्ये LPG सिलिंडरची किंमत 829 रुपये
- चेन्नईत LPG सिलिंडरची किंमत 818.50 रुपये
व्यावसायिक गॅस सिलिंडर 19 किलोचा
घरगुती सिलेंडर 14 किलोचा आहे, तर व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर 19 किलोचा आहे. घरगुती एलपीजीचा वापर प्रामुख्याने स्वयंपाकाचा गॅस म्हणून केला जातो. एलपीजीवरही सरकार सबसिडी देते. हे लहान सिलेंडर म्हणून देखील वापरले जाते. लहान सिलेंडर 5 किलोचा आहे.
व्यावसायिक सिलिंडरवर सरकारी अनुदान नाही
व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक कामांसाठी वापरला जातो. त्यावर कोणतेही सरकारी अनुदान दिले जात नाही. हे सहसा मोठे सिलेंडर असतात आणि नैसर्गिक वायू किंवा इतर इंधनांपेक्षा जास्त ऊर्जा प्रदान करतात.












Click it and Unblock the Notifications