LPG Cylinder Price Hike:दिवाळी आधीचं महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ,जाणून घ्या
LPG Cylinder Price Hike: दसरा आणि दिवाळीसारख्या मोठ्या सणासुदीच्या तोंडावर महागाईचा तडाखा सहन करण्यासाठी ग्राहकांना तयार राहावे लागणार आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. विशेष म्हणजे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 50 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या नवीन किमती:
देशभरातली प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. आजपासून दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 1740 रुपयांना मिळणार आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्येही दर वाढले आहेत.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. काही प्रमुख शहरांमध्ये 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरचे सध्याचे दर खालील प्रमाणे.
दिल्ली- 803 रुपये
मुंबई - 802.50 रुपये
कोलकाता - 829 रुपये
चेन्नई - 818.50 रुपये
बेंगळुरू- 805.50 रुपये
देशभरातली प्रमुख शहरांमध्ये सिलेंडरच्या किमती:
दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 48.50 रुपयांनी महागला असून आता 1740 रुपयांचा झाला आहे. मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 39 रुपयांनी वाढून 1692.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ते 48 रुपयांनी महाग झाले असून आता 1850.50 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 38 रुपयांनी वाढून 1855 रुपये झाली आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्येही एलपीजी सिलिंडरची किंमत वाढल्या आहेत. लखनऊमध्ये घरगुती सिलिंडर 840.5 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडर 1861 रुपये झाला आहे. पाटणामध्ये घरगुती सिलेंडरची किंमत 892.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1995.5 रुपये आहे.
सणांवर महागाईचा भडका:
दसरा आणि दिवाळीसारख्या महत्वाच्या सणांच्या आधी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत झालेली ही वाढ ग्राहकांसाठी महागाईचा भडका असणार आहे. याचा थेट परिणाम व्यावसायिक क्षेत्रावर होणार आहे. कारण व्यावसायिक सिलिंडरचा वापर रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ न झाल्याने घरगुती ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढल्याचा परिणाम बाजारातील किंमतींवर होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications