स्विगी, बिगबास्केट, झोमॅटोच्या माध्यमातून लवकरच दारूची होम डिलिव्हरी?

नवी दिल्ली - स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो सारखे प्लॅटफॉर्म लवकरच बिअर, वाइन आणि लिकर यांसारख्या कमी-अल्कोहोल ड्रिंक्सची मद्य वितरीत करण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ ही राज्ये यासंबंधी पाऊले उचलत आहेत. यासंदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने वृत्त दिले आहे.

ओडीसा, प. बंगालमध्ये परवानही

एका उद्योग अधिकाऱ्यांचा हवाला देऊन हा अहवाल देण्यात आला आहे. संबधित अधिकारी म्हणाले. सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये अल्कोहोलच्या होम डिलिव्हरीला परवानगी आहे.

Home Delivery Liquor Latest Update

विशेषत: मोठ्या शहरांमधील वाढत्या परदेशी लोकसंख्येची पूर्तता करण्यासाठी, जेवणाबरोबरच मद्यपान करण्याकडे कल असलेल्या ग्राहकांची संख्या पाहता हे पाऊल उचलले जात आहे.

कोविड काळात होती तात्पुरती सुविधा

महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात मद्य वितरणास परवानगी होती, परंतु त्यात काही निर्बंधही होते. अहवालानुसार, संबंधित उद्योग अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाइन वितरणामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील विक्रीत 20 ते 30% वाढ झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+