LOC लगतच भूसुरुंगाचा स्फोट, 6 जवान गंभीर जखमी: गस्त घालत असताना नेमका कसा घडला स्फोट?
Landmine Blast Near LOC Injured 6 Jawans : जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे मंगळवारी एलओसीजवळ भूसुरुंगाच्या स्फोटात लष्कराचे सहा जवान गंभीर जखमी झाले आहेत. भवानी सेक्टरमधील मकरी भागात हा स्फोट झाल्याचे माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा रायफल्सच्या सैनिकांची तुकडी राजौरीतील खंभा किल्ल्याजवळ सकाळी 10.45 वाजता गस्त घालत असताना हा स्फोट झाला आहे.
सर्व जखमींना उपचारासाठी 150 जनरल रुग्णालयात (GH) राजौरी येथे नेण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.

गस्त घालताना भूसुरुंगावर पडला पाय
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशेरमधील खंभा किल्ल्यावर सकाळी 10:45 वाजता गस्त घालत असताना एका सैनिकाचा चुकून भूसुरुंगावर पाय पडला. त्यामुळे हा स्फोट झाला.
नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी रोखण्यासाठी या भूसुरुंग टाकण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या भूसुरुंग काहीवेळा त्यांच्या ठिकाणाहून वाहून जातात, त्यामुळे असे अपघात घडतात.
जखमी जवानांची नावे...
हवालदार एम गुरुंग (41)
हवालदार जे थाप्पा (41)
हवालदार जंग बहादूर राणा (41)
हवालदार आर राणा (38)
हवालदार पी बद्र राणा (39)
हवालदार व्ही गुरुंग (38)
2024 मध्ये अशा 2 घटना घडल्या...
9 डिसेंबर 2024 रोजी जम्मूच्या पुंछमध्ये स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक जवान शहीद झाला होता. पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना भूसुरुंगाच्या स्फोटात हवालदार व्ही. सुब्बय्या वारीकुंटा यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले होते.
तसेच, ऑक्टोबर 2024 मध्ये कुपवाडा येथे सुरंग स्फोट झाला होता, ज्यामध्ये लष्कराचे दोन जवान जखमी झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास सैनिक या भागात गस्त घालत होते.












Click it and Unblock the Notifications