Kamgar Din 2025 : देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व कामगार बांधवांना द्या खास शुभेच्छा!
Kamgar Day 2025 Wishes In Marathi : दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रमजीवी जीवन जगणाऱ्यांचा सन्मान दिवस म्हणून कामगार दिनाला ओळखले जाते.
1886 सालापासून कामगार दिन साजरा केला जातो. हा दिवस कामगारांचे समान हक्क आणि 8 तास कामाच्या धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये कामगार दिनाला सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी कामगार संघटना असो किंवा कामगारांशी संबंधित असलेल्या संस्था, लोक हे कार्यक्रमांचे आयोजन करतात. कामगारांचा सन्मान करतात, तर काही ठिकाणी पुरस्कार सोहळे देखील पार पडतात.

यंदाच्या कामगार दिनानिमित्त तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला व कामगार संघटनेसोबत जोडलेल्या लोकांना शुभेच्छा खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता ते ही मराठीमध्य, चला तर जाणून घेऊया, त्यासंदर्भातील शुभेच्छा संदेश अन् जरूर शुभेच्छा संदेश पाठवून कामगार दिन साजरा करा..!
कामगार दिन शुभेच्छा संदेश (International Labour-Kamgar Day Wishes In Marathi)
देशाच्या जडणघडणीत मोलाचे
योगदान देणाऱ्या माझ्या सर्व
श्रमिक बांधवांना...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तो जिवंत ठेवतो कामाचे आगार,
उभारतोस स्वप्नांचे मीनार
कामगारा तुझ्या कष्टाला,
लाख लाख सलाम
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कुटुंबाचे पोट भरतो अतोनात कष्ट करून
कष्टाची भाकर खातो अशा सर्व कष्टकरी बांधवांना
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी मानतो तो कामात आहे
नाही कुठे तो घामात आहे
शोधात जो तो उगाच त्याच्या
तो राबणार या घामात आहे
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवस हक्काचा...
दिवस कामगारांचा...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जो मेहनतीने त्रासाला दूर करतो,
रक्त आणि घाम गाळण्यासाठी जो मजबूर असतो,
तो प्रत्येक जण 'मजदूर' असतो...
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुच जिवंत ठेवतो कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मिनार
कामगारा तुझ्या अपार कष्टाला
कोटी कोटी प्रणाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट...
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

कामगार कल्याणाचे राखू धोरण,
देऊया कामगारांना योग्य मान-सन्मान,
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्रमाला लाभावा मोल सर्वदा
अन् घामाला मिळावा योग्य तो दाम
कामगारांच्या हाताला मिळो काम
अणि कामाला मिळो नेहमी सन्मान
कामगार दिनाच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!
एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सातत्याने नवनिर्मितीचे कार्य करणाऱ्या
सर्व श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाला
कामगार दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!
हक्काचा दिवस कामगारांचा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
काम म्हणजे पैसे कमवणे नव्हे;
तुम्ही आयुष्याला न्याय देण्यासाठी काम करा
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
एकजुटीने काम करू
कामावरती प्रेम करू
कामगार दिनाच्या शुभेच्छा
शेतकरी ते कष्टकरी प्रत्येकाला
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
काम करा हो काम करा कामावरती प्रेम करा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

कराल कष्ट तर होईल दारिद्र्य नष्ट
कामगार दिनाच्या शुभेच्छा
कष्टाची भाकर मिळते कामातून,
काम करा आणि मोठे व्हा...
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुच जिवंत ठेवतो कामाचे आगार
उभारतोस स्वप्नांचे मिनार
कामगारा तुझ्या अपार कष्टाला
कोटी कोटी प्रणाम
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जगतो जगासाठी आयुष्यभर
मायमातीचा आधार,
नाही कुणाचा लाचार,
माझ्या भूमितला कामगार
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा.
1 मे काना सांभाळून घ्या.
1 मे कांची काळजी घ्या.
1 मे कांच्या संपर्कात रहा.
1 मे काना मदत करा.
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपण सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा इतिहास
आंतरराष्ट्रीय कामगार दिवस हा दरवर्षी 1 मे रोजी साजरा करण्यात येतो. सर्वप्रथम हा दिवस 1889 मध्ये साजरा करण्यात आला. या दिवसाचा इतिहास हा पॅरिस आणि अमेरिकेतून सुरू होतो. अमेरिकेतील कामगारांनी आपल्या कामांचे तास हे 12 तासांच्या ऐवजी आठ तास करण्याची मागणी केली. ही मागणी लावून धरत 1 मे 1886 रोजी संप पुकारला.
या संपात सहभागी कामगार रस्त्यावर उतरले. मात्र, त्यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात काही कामगारांनी आपले प्राण गमावले. यानंतर या लढ्याला आणखी धार आली. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी सम्मेलनाची एक बैठक पार पडली. या बैठकीत कामगाराच्या कामाचे तास 12 तासांऐवजी 8 तास करण्यात आले. तसेच 1 मे रोजी जागतिक कामगार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications