Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : एकनाथ शिंदेंसह त्यांच्या मंत्र्यांनी केले शाहीस्नान; न थकता केले योगींचे कौतूक, म्हणाले...

प्रयागराज महाकुंभाच्या ४३ व्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली. आतापर्यंत ६३ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ अशा अनेक सेलिब्रिटींनी आज त्रिवेणी संगमात स्नान केले. महाशिवरात्रीच्या स्नानापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रयागराजमध्ये एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात एडीजी, डीआयजी, आयुक्त, जिल्हाधिकारी आणि फेअर ऑफिसरसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

Eknath Shinde

एकनाथ शिंदेंकडून योगींचे कौतूक

प्रयागराज येथे सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता शिंदे यांच्यासह महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान केले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे आणि मंत्री भरत गोगावले, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शाही स्नान केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १४४ वर्षांनंतर होणारा महाकुंभ अद्भुत आहेत. कोट्यवधी लोक येथे येऊन गेलेत, मात्र सगळ्यांना समान वागणूक मिळाली. येथे कोणीही लहान मोठे नाही. ५० कोटीहून अधिक लोकांनी कुंभ स्नान केले, हा एक विश्वविक्रम आहे. प्रयागराज येथील महाकुंभाची व्यवस्था उत्तम केल्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही शिंदे यांनी कौतुक केले.

विक्रमाचेही केले कौतूक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, इथे येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ मेळ्याचे उत्तम नियोजन केले. मागील दीड महिना न थकता योगीजी आणि त्यांच्या टीमने महाकुंभ मेळ्याची चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली. आतापर्यंत ६० कोटी लोकांनी महाकुंभात स्नान केले. अर्थात भारताच्या निम्म्या लोकांनी गंगा स्नान केले आणि गंगा नदीचे जल घरी घेऊन गेले. गंगेचे पवित्र जल आणि महाकुंभाची सकारात्मक ऊर्जा देशातील घराघरात पोहोचेल आणि देश प्रगती करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+