kolkata rape murder case : बंगाल बंद दरम्यान हिंसाचार: भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार, बॉम्बफेक!
kolkata rape murder case : कोलकात्यात प्रशिक्षणार्थी महिला डाॅक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरनानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तंग आहे. आज भाजपच्या पश्चिम बंगाल बंद दरम्यान हिंसाचार झाला असून भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला तर एका ठिकाणी बॉम्बफेकही झाली यात दोघे जखमी झाले आहेत.
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी विद्यार्थी संघटनांनी काढलेल्या निषेध मोर्चानंतर भाजपने बुधवारी बारा तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. बंददरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि भाजप समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे. शेकडो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जमावाकडून सहा ते सात राऊंड फायर!
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भाटापारा येथे बंद दरम्यान भाजप नेत्याच्या गाडीवर गोळीबार झाला. भाजप नेते प्रियंगू पांडे यांनी सांगितले - टीएमसीच्या सुमारे 50-60 लोकांनी रस्ता रोखला आणि वाहन थांबवले आणि जमावाकडून 6-7 राउंड फायर केले गेले आणि 7-8 बॉम्ब फेकले गेले. चालकासह दोघांना गोळ्या लागल्या. एक गंभीर आहे.
भाजप-टीएमसी कार्यकर्त्यात हाणामारी
दरम्यान, नादिया आणि मंगलबारी चौरंगी येथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. टीएमसी समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. बाणगाव आणि बारासत दक्षिणेत गाड्या थांबवण्यात आल्या. तर दुसरीकडे कोलकाता उच्च न्यायालयाने भाजपच्या बंगाल बंदला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली आहे.
#WATCH | West Bengal: Police recovered empty bomb shells from near the spot where BJP leader Priyangu Pandey was attacked in Bhatpara of North 24 Parganas
— ANI (@ANI) August 28, 2024
Priyangu Pandey claimed that several people attacked and fired on his car, earlier today, in Bhatpara of North 24 Parganas https://t.co/WRreN8Hfiu pic.twitter.com/f9jiuWvHCv
पोलिसांकडून बाॅम्बचे रिकामे शेल जप्त
उत्तर 24 परगणा येथील भाटपारा येथे भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणाजवळून पोलिसांनी बॉम्बचे रिकामे शेल जप्त केले. प्रियंगू पांडे यांनी दावा केला की, आज उत्तर 24 परगणा येथील भाटपारा येथे अनेक लोकांनी त्याच्या कारवर हल्ला केला आणि गोळीबार केला.
काय आहे भाजप नेते प्रियंगू पांडेंचा दावा?
बंगाल बंद दरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला तसेच "बॉम्ब फेकले आणि वाहनावर गोळीबार केला" असा भाजपचे प्रियंगू पांडे यांचा दावा आहे. दरम्यान, नंदीग्राममध्येही भाजपच्या निषेधात कार्यकर्ते सामील झाले असून 12 तासांच्या 'बंगाल बंद'ची हाक देण्यात आली आहे. काल नबन्ना अभियानादरम्यान अश्रुधुराचा वापर केल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपने 12 तासांचा 'बंगाल बंद' पुकारला आहे.
लाठीचार्ज विद्यार्थ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ बंद
कोलकातात काल विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या विद्यार्थी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि बळाचा वापर झाला होता. यानंतर आंदोलकांना अटकही झाली होती. या लाठीचार्ज आणि अटकेच्या निषेधार्थ भाजपने आज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत बंद पुकारला आहे.












Click it and Unblock the Notifications