Kolkata Rape Murder Case Update : सीबीआयकडून मुख्य आरोपी संजय रॉयविरुद्ध आरोपपत्र दाखल!
Kolkata Rape Murder Case Update : कोलकाता येथील आरजी कर मेडीकल काॅलजमधील एका डाॅक्टर युवतीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी सीबीआयने मुख्य आरोपी संजय रॉय याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले आहे.
यासंदर्भात पीटीआयने वृत्त दिले आहे. कोलकाता येथील विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने म्हटले आहे की, स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या रॉयने 9 ऑगस्ट रोजी पीडिता एकटी झोपेत असताना हा गुन्हा केला होता. या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एजन्सीने सामूहिक बलात्काराच्या आरोपाचा उल्लेख केला नाही, म्हणजेच संशयित रॉय याने एकट्यानेच हा गुन्हा केला असल्याचे दिसून येते. याप्रकरणी सीबीआय तपास करत आहे.

काय घडला होता प्रकार
पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळच्या सुमारास एका महिला ट्रेनी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. रात्रीच्या जेवणानंतर ही महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये झोपली होती. तिथेच आरोपीने बलात्कार करून तिची हत्या केली होती. ही घटना नऊ ऑगस्टला घडली होती.
सहा तासात आरोपीला अटक
बलात्कार आणि हत्येची ही घटना रात्री तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली, डॉक्टरांनी घटनेविरोधात निषेध नोंदवत तिव्र आंदोलनं केली. त्यानंतर दहा ऑगस्टला पोलिसांनी टास्क फोर्सची स्थापना करून तपास सुरू केला आणि सहा तासांच्या आत घटनेतील संशयित आरोपी संजय रॉयला अटक केली.
घटनास्थळी तुटलेला ब्लुथुट, इअरफोन
सीसीटीव्ही फुटेजव्यतिरिक्त पोलिसांना घटनास्थळी (सेमिनार हॉल) एक तुटलेला ब्लूटुथ इअरफोन आढळून आला होता. हा इअरफोन आरोपीच्या फोनशी कनेक्ट झाला आणि त्याआधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली.
देशभरात डाॅक्टरांचे तीव्र आंदोलन
या प्रकरणी देशभरातली डाॅक्टर संतप्त झाले होते त्यांनी याघटनेनंतर अविरत आंदोलन केले होते. कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य डॉ. संदीप घोष यांनी या घटनेनंतर राजीनामा दिला. कोलकाता हायकोर्टानं प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं होत नसल्याचं म्हणत तपास सीबीआयकडे सुपूर्द केला. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणी तपास केला आणि दोषारोपपत्र दाखल केले आहे.












Click it and Unblock the Notifications