Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तीन तासांनंतर दाखवला मुलीचा विवस्त्र मृतदेह, ट्रेनी डाॅक्टर तरुणीच्या कुटुंबाचे गंभीर आरोप

Kolkata Doctor Rape Murder Case: कोलकातामधील आरजी कर मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पिटलमध्ये 31 वर्षीय ट्रेनी डाॅक्टर तरुणीसोबत जे घडले त्यामुळे सगळ्यांनाच हादरा बसला आहे, बलात्कारानंतर हत्या करण्यात आलेल्या ट्रेनी डाॅक्टर तरुणीच्या आई-वडिलांनी आता मौन सोडले असून, गंभीर आरोप केले आहेत.

कुटुंबाने आरोप करताना म्हटले आहे की, सुरुवातीला त्यांना त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे खोटे सांगण्यात आले. शिवाय मुलीचा मृतदेह दाखवण्यासाठी हाॅस्पिटल बाहेर तीन तास प्रतिक्षा करण्यास भाग पाडले.

Kolkata Rape Murder Case Girl s naked body shown after three hours  trainee doctor alleges girl s family

ट्रेनी डाॅक्टरच्या पित्याने सांगितले की, हाॅस्पिटल प्रशासनाने सुरुवातीला त्यांना सांगितले की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. परंतु नंतर कोलकाता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पित्याने सांगितले की फोन आल्यावर त्यांना ताबडतोब हाॅस्पिटलला येण्यास सांगितले होते. ते म्हणाले की, मी लगेच पोहचलो होतो, पण तीन तास मला मृतदेह दाखवला नाही, पित्याने सांगितले की, जेव्हा तीन तासांनतर मला आत जाऊ दिले, तेव्हा माझ्या मुलीचा विवस्त्र मृतदेह पाहून माझे हातपाय गळाले, मला काहीच सुचेना.

तसेच ट्रेनी डाॅक्टर तरुणीच्या नातेवाईकाने 'इंडिया टुडे' शी बोलताना सांगितले की, तिच्या डोळ्यात तुटलेली काच होती, तिचे पाय 90 डिग्रीवर पसरले होते. तिची ही अवस्था पाहूनच कळते की तिला कशा प्रकारच्या यातना दिल्या गेल्या आहेत, कारण अशी अवस्था तोवर शक्य नाही जोवर पेल्विक गर्डल फ्रॅक्चर होत नाही.

मातापित्यासोबत आलेल्या एका नातेवाईकाने सांगितले की, हास्पिटलला पोहचल्यानंतर त्यांना तीन तास प्रतिक्षा करावी लागली. माता-पित्याने हास्पिटलच्या अधिका-यांना आपल्या मुलीचा चेहरा दाखवण्याची विनंती केली, पण त्य़ासाठी त्यांना तीन तास वाट पहावी लागली.

शवविच्छेदनात धक्कादायक खुलासे

शवविच्छेदन अहवालात प्रशिणार्थी डाॅक्टर तरुणीला देण्यात आलेल्या गंभीर यातनांचा खुलासा झाला आहे.यात म्हटले आहे की, आरोपी संजय राॅय ने तिला जोरात मारल्याने तिचा चष्मा तुटला आणि त्याचे तुकडे तिच्या डोळ्यांत घुसले. अहवालात तिच्या चेह-यावर, डोळ्यांत, गुप्तांग, पोट, डावा पाय, उजवा हात, अनामिका आणि ओठांवर गंभीर इजा करण्यात आल्या आहेत.

URL- kolkata doctor assassinationr case trainee doctors parents made serious allegations

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+