कोलकाता बलात्कार, हत्येचा संताप! देशभरातील डाॅक्टर्स उतरले रस्त्यावर, IMA चा देशव्यापी संप

कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण चर्चेत आहे. बुधवारी रात्री हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली होती, त्यानंतर हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.

याप्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) 17 ऑगस्टपासून पुढील 24 तासांसाठी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.

kolkata rape murder case doctors protest continues across the country

देशभरातील डॉक्टर 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तास संपावर जाणार आहेत. या काळात आपत्कालीन शस्त्रक्रिया वगळता इतर कोणत्याही शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत.

हाॅस्पिटल तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 24 जणांना अटक

14 ऑगस्टच्या रात्री कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये तोडफोड करणाऱ्या लोकांची पोलिस सातत्याने ओळखपरेड करून त्यांना अटक करत आहेत. आता या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर अटक केलेल्यांची संख्या 24 झाली आहे.

ममता बॅनर्जींविरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप नेते ताब्यात

कोलकाता घटनेनंतर आज भाजप ममता बॅनर्जी सरकारचा निषेध करत आहे. कोलकाता येथील शामबाजार मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ममता बॅनर्जी सरकारविरोधात भाजपचा आक्रोश

कोलकाता घटनेबाबत भाजपने ममता सरकारविरोधात हल्लाबोल सुरु केला आहे. यादरम्यान भाजप नेते अग्निमित्रा पॉल आणि रूपा गांगुली यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रूपा गांगुली म्हणाल्या की, ममता पश्चिम बंगालच्या आरोग्यमंत्रीही आहेत, त्यांनी या घटनेनंतर राजीनामा द्यावा.

कोलकात्यात भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट

कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येवरून देशभरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या विरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. दरम्यान, भाजपकडूनही ममता बॅनर्जींचा निषेध करण्यात येत आहे. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

आरोपी संजय रॉयची वैद्यकीय तपासणी केली जाणार

कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या संजय रॉयची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

सीबीआयचे कोलकाता हास्पिटलमधील चार डॉक्टरांना समन्स
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांना सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेने सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये बोलावले आले आहे. घटनेच्या रात्री संबंधित सर्व घटनांबाबत सीबीआय या डॉक्टरांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक बलात्काराची शक्यता

ऑल इंडिया गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशनच्या अतिरिक्त सचिव डॉ. सुवर्णा गोस्वामी यांनी 14 ऑगस्टच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा हवाला देत हा बलात्कार नसून सामूहिक बलात्कार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या प्रायव्हेट पार्टमधून 151mg सिमेन सापडले आहे. इतके प्रमाण कोणा एका व्यक्तीकडे असू शकत नाही. बलात्कार प्रकरणात एकापेक्षा जास्त जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, घटनेच्या 5 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधान केले असून ते म्हणाले- पीडितेला न्याय देण्याऐवजी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. समाजात घडणाऱ्या अशा घटनांना आळा बसेल अशी शिक्षा गुन्हेगारांना झाली पाहिजे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+