कोलकाता प्रकरणातील ज्युनियर डाॅक्टरसोबत सामूहिक बलात्कार झालेला नाही, सीबीआयचा दावा, पालक म्हणाले...
Kolkata Doctor Case : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल हॉस्पिटलमधील 31 वर्षीय ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणासंदर्भातील 'हा बलात्कार होता की सामूहिक बलात्कार' या प्रश्नाचे सर्वांना पडला आहे, आता याप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास स्थिती अहवालात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराबाबत माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ज्युनियर डॉक्टरच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. 9 ऑगस्ट रोजी सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये संजय रॉय यानेच बलात्कार आणि नंतर डॉक्टरची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरजी कार रुग्णालयाच्या आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे की, 'आम्ही तपासावर खूश नाही.' तसेच आरोपी संजय रॉय याला कोणीतरी त्यांच्या मुलीची हत्या करण्यासाठी पाठवल्याचं मृताच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरावर फक्त बलात्काराचे पुरावे सापडले!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सामूहिक बलात्काराचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. डीएनए अहवालातही एका व्यक्तीच्या सहभागाची पुष्टी झाली आहे. याचाच अर्थ या क्रूरतेमध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा सहभाग असल्याची पुष्टी झालेली नाही. सीबीआयने सीसीटीव्ही फुटेजही तपासले, ज्यात संजय रॉय डॉक्टरची हत्या झालेल्या इमारतीत प्रवेश करताना दिसतो.
सामूहिक बलात्काराच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आणि प्रचंड निदर्शने झाली.
संजय रॉय वर घरगुती हिंसाचाराचा देखील आधी गुन्हा दाखल झाला होता. त्याला रुग्णालयातील सर्व विभागांमध्ये प्रवेश होता. संजय रॉयचा ब्लूटूथ हेडसेट गुन्ह्याच्या ठिकाणी सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र, सीबीआयने या प्रकरणात आणखी लोकांच्या सहभागाचा तपास पूर्ण केलेला नाही. एजन्सीद्वारे फॉरेन्सिक अहवाल स्वतंत्र तज्ञांना त्यांच्या अंतिम मतासाठी पाठवण्याची शक्यता आहे. डॉक्टरांच्या पालकांचा दावा- त्यांच्या मुलीला मारण्यासाठी आरोपी संजय रॉयला पाठवण्यात आले
बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या पालकांनी आरोपी संजय रॉयला कोणीतरी त्यांच्या मुलीची हत्या करण्यासाठी पाठवल्याचा धक्कादायक दावा केला आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला घटनेच्या एका दिवसानंतर 10 ऑगस्ट रोजी अटक केली होती. 9 ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर पीडितेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची पुष्टी झाली.












Click it and Unblock the Notifications