Kolkata doctor rape-murder case: संजय रॉयसह 7 आरोपींची पॉलीग्राफ चाचणी सुरू! सत्य उघड होणार
Kolkata doctor rape-murder case: कोलकाता कोर्टाच्या आदेशाने आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या सात आरोपींची पॉलीग्राफ चाचणी सुरू झाली आहे.
कोलकाता येथील आरजी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या निर्दयी प्रकरणी आता या पॉलीग्राफ चाचणीतून संपूर्ण सत्य समोर येईल, असे मानले जात आहे.

हायकोर्टाच्या आदेशावरून हायकोर्टाने संजय रॉय आणि संदीप घोष यांच्यासह 7 जणांची पॉलीग्राफ टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. हे ते 7 लोक आहेत ज्यांनी घटनेच्या रात्री प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसोबत जेवण केले होते.
प्रिन्सिपलसह 'या' सात जणांची पॉलीग्राफ चाचणी
कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणातील सात जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी हायकोर्टाने दिली आहे, या लोकांमध्ये चार डॉक्टरांचा समावेश आहे. या आरोपींमध्ये संजय रॉय, माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष, घटनेच्या रात्री पीडितेसोबत उपस्थित असलेले चार डॉक्टर आणि एका स्वयंसेवकाचा समावेश आहे त्यांच्या विधानांची सत्यता तपासता कारण इतर वैद्यकीय अहवालांमध्ये पुरेसे पुरावे सापडलेले नाहीत.
का होत आहे 7 लोकांची पाॅलिग्राफ टेस्ट?
या प्रकरणाच्या वैद्यकीय अहवालात, पीडितेच्या शरीरातून घेतलेले डीएनए, योनीतील स्वॅब आणि पीएम रक्ताचे नमुने या आरोपींचा घटनेशी संबंध आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने ही चाचणी करण्यास परवानगी दिली आहे.
काय आहे पाॅलीग्राफ चाचणी?
पॉलीग्राफ चाचण्यांद्वारे व्यक्ती खोटे बोलतोय की खरे हे स्पष्ट होऊ शकते. ते शोधण्यासाठी प्रश्नांची उत्तरे देताना श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके आणि गॅल्व्हॅनिक त्वचेच्या प्रतिसादासारख्या शारीरिक हालचाली आणि प्रतिक्रीयांचे निरीक्षण केले जाते.
पॉलीग्राफ चाचणी कशी केली जाते?
पॉलीग्राफ चाचणीमध्ये, न्युमोग्राफ, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रेकॉर्डर आणि गॅल्व्हनोमीटर यांसारखी अनेक उपकरणे शरीरावर ठेवली जातात. ही उपकरणे चौकशी दरम्यान शारीरिक प्रतिसादांमध्ये बदल मोजतात. यानंतर, या उपकरणांमधून गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण केले जाते आणि व्यक्तींनी दिलेल्या उत्तरांच्या सत्यतेचे मूल्यांकन केले जाते.
संजय रॉय यांना पॉर्न पाहण्याचे व्यसन
कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या मनोविश्लेषणात अनेक मोठे खुलासे केले आहेत ज्यात त्यांना पॉर्न व्हिडिओ पाहण्याचे व्यसन आणि "प्राण्यासारख्या वृत्ती" याचा समावेश आहे. घटनेच्या रात्री रॉयने कथितरित्या रुग्णालयात अनेक वेळा प्रवेश केला आणि बाहेर पडला आणि अखेरीस प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून करून घटनास्थळावरून पळ काढला.
तपासात हाही खुलासा आला समोर!
याशिवाय रॉय जवळच्या रेड लाईट एरियात गेला होता आणि रुग्णालयातून परतत असताना त्याने आणखी एका मुलीचा विनयभंग केल्याचेही तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.












Click it and Unblock the Notifications