Kolkata Rape Murder Case : कोलकाता प्रकरणातील आरोपीचा पाॅलीग्राफ टेस्टदरम्यान धक्कादायक दावा
Kolkata Rape Murder Case : कोलकातामधील प्रशिणार्थी महिला डाॅक्टरवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रायने पाॅलीग्राफ टेस्ट मध्ये धक्कादायक दावा केला असून अनेक न पटणारी उत्तरे दिली आहेत. संजयने या प्रकरणी निर्दोष असल्याचे म्हटल्यानंतर सीबीआयकडून त्याची पाॅलीग्राफ टेस्ट केली
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार या टेस्टदरम्यान संजयने अनेक खोटी आणि न पटणारी उत्तरं दिली आहेत. इतकंच नव्हे तर लाय डिटेक्टर टेस्टदरम्यान तो अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होता, असंही त्यात म्हटले आहे.
कोलकातामधील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयची सीबीआयकडून पॉलीग्राफ टेस्ट (लाय डिटेक्टर टेस्ट) करण्यात आली. जेव्हा तो सेमिनार हॉलमध्ये पोहोचला होता, तेव्हा पीडित महिलेचा आधीच मृत्यू झाला होता, असा दावा त्याने या पॉलीग्राफ टेस्टमध्ये केला.

संजयने जबाब फिरवला
सेमिनार हॉलमध्ये पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टर आधीच मृतावस्थेत आढळल्याचं संजयने सीबीआयने अनेक पुरावे देऊनही सांगितले आहे. तिचा मृतदेह पाहून मी घाबरून तिथून पळालो, असं तो म्हणाला. कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर संजय रॉयने बलात्कार आणि हत्या केल्याची कबुली दिली होती. मात्र आता त्यानेआपला जबाब फिरवला आहे. मी निर्दोष असून मला यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप त्याने केला आहे.
तपास अधिकारी काय म्हणाले?
"संजय हा तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि गुन्ह्याच्या वेळी सेमिनार हॉलमधील त्याची उपस्थिती यांविषयी तो कोणतेच स्पष्टीकरण देऊ शकतनाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना दिली.
संजयने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोरही असाच दावा केला होता. माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी पॉलीग्राफ चाचणीस संमती देतोय, असं संजयने सांगितले होते. आरोपीची पॉलीग्राफ चाचणी करण्यापूर्वी त्याची आणि कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक असते, मात्र सीबीआय आणि पोलिसांना त्याच्या निर्दोषत्वाच्या दाव्यांमध्ये स्पष्ट विसंगती आढळून आली
घटनास्थळी संजयचा ब्ल्युटूथ हेडसेट
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पीटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळली होती. शवविच्छेदनदरम्यान तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता 9 ऑगस्ट रोजी आरोपी संजय पहाटे 4.03 वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीत जाताना दिसला होता. एवढेच नाही तक नव्हे तर त्या ठिकाणी त्यांना संजयचा ब्ल्युटूथ हेडसेटसुद्धा सापडला होता.












Click it and Unblock the Notifications