Kojagiri Purnima Wishes Marathi 50+ quotes : कोजागिरीसाठी 50+ शुभेच्छा संदेश, प्रियजननांना शेअर करा
Kojagiri Pournima 2025 Wishes in marathi : शरदाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेली, आणि माता लक्ष्मीच्या कृपेने पावन झालेली, अशी ही कोजागिरी पौर्णिमेची रात्र ६ ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. या शुभदिनी, चंद्रप्रकाशात ठेवलेल्या केशरी दुधाचा आस्वाद घेत आपण सारे रात्रभर जागरण करतो आणि सुख-समृद्धीची कामना करतो.
आपल्या प्रियजनांचे आणि आप्तस्वकीयांचे जीवन आनंद आणि गोडव्याने भरून जावे, यासाठी या अमृतमयी रात्रीच्या भावना व्यक्त करणारे ५० हून अधिक आकर्षक, पारंपारिक आणि मनमोहक शुभेच्छा संदेश, कोट्स आणि स्टेटस खास तुमच्यासाठी! या संदेशांनी तुमच्या कोजागिरीची रात्र अधिक खास आणि मंगलमय करा.

कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा संदेश (Kojagiri Pournima 2025 Wishes in marathi)
१. पारंपरिक आणि धार्मिक शुभेच्छा
- आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन, 'कोण कोण जागे' हे पाहण्यास लक्ष्मी येते दाराशी येऊन. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
- चंद्राच्या शीतल प्रकाशात, बासुंदीचा गोडवा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनात सदैव राहो. कोजागिरीच्या शुभेच्छा!
- शरद पौर्णिमेच्या या शुभ रात्रीला तुमच्यावर अमृतवर्षा व्हावी, हीच सदिच्छा.
- कोजागिरी म्हणजे जागरूकेता, वैभव, उल्हास आणि आनंदाचा उत्सव! देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना.
- हा सण तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीची भरभराट करणारा ठरो.
- कोजागिरीच्या रात्री चंद्रासोबत देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. आपणास शुभ आशीर्वाद मिळो.
- ज्याप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र पूर्ण असतो, त्याचप्रमाणे तुमचे आयुष्यही आनंदाने भरलेले असो!
- चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता आणि प्रेम आपणास मिळो, हीच प्रार्थना!
- कोजागिरी निमित्त तुम्हाला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी लाभो!
- पांढऱ्या शुभ्र दुधात दिसे पौर्णिमेचे चांदणे, वाढो स्नेह मनातला, जसा वाढतो चंद्र कोजागिरीचा!
२. चंद्र आणि निसर्गावर आधारित कोट्स
- दूध केशरी, चंद्र-चांदणे, कोजागिरीचे रूप आगळे! कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- चांदण्यात न्हाऊन निघाली चांदरात, कोजागिरीच्या चंद्राचा पसरला रुपेरी प्रकाश.
- शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र... चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र!
- चांदण्याची शीतलता आणि दुधाचा गोडवा, अनुभवूया कोजागिरीचा अलौकिक सोहळा!
- हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी!
- चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात!
- कोजागिरीचे चांदणे हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा जसा साऱ्यांच्या जीवनात!
- मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा... कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
- पौर्णिमेचा तेजस्वी प्रकाश आणि गोड दुधाचा आस्वाद, हा दिवस आपल्यासाठी खूप खास असो!
- गगनातील चंद्राचा प्रकाश आणि जमिनीवरील उत्साहाचा प्रवास.
३. लहान आणि आकर्षक स्टेटस
- प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करूया सण कोजागिरीचा! Happy Kojagiri Purnima!
- दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे! कोजागिरीच्या खूप शुभेच्छा!
- कोजागिरी पौर्णिमेची लखलखती रात्र!
- फक्त आनंद, उत्साह आणि वैभव! कोजागिरी!
- पौर्णिमेच्या चंद्राची शीतल भेट!
- कोजागिरीचा योग! समृद्धीचा भोग!
- जागूया आजची रात! बासुंदीची मेजवानी खास!
- चांदणे आणि केशरी दूध! याहून सुंदर काय?
- कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा!
४. मैत्री आणि नात्यांसाठी खास संदेश
- हे दूध केशरी कोजागिरीचे खास, वेलची, बदाम आणि पिस्ते सारे एक साथ... अशीच कायम राहो आपल्या सर्वांची साथ!
- आपल्या नात्यातील प्रेम, गोडवा आणि विश्वास कोजागिरीच्या चंद्रासारखाच वाढत राहो.
- चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी!
- तुमचे आणि कुटुंबियांचे जीवन सुखाच्या किरणांनी उजळून निघो. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
- नात्याचा गोडवा दुधापेक्षा मधुर व्हावा, हीच आजच्या कोजागिरीची प्रार्थना!
- आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा, हीच सदिच्छा!
- एकाच छताखाली एकत्र अनुभवूया कोजागिरीची रास लीला!
- तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
- चंद्राच्या शीतल प्रकाशात आपले जीवनही तेजस्वी होवो!
- कुटुंबासोबतचा हा अमृतमयी क्षण तुमच्या आठवणीत कायम राहो!
५. आधुनिक आणि शुभेच्छा कोट्स
- कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला दीर्घायुष्य देणारी आणि समृद्धीची भरभराट करणारी ठरो!
- शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती म्हणजे कोजागिरी.
- आयुष्यात आनंद आणि समृद्धीचा पाऊस येवो! शुभ कोजागिरी!
- आज रात्री चंद्रमंडलातून येणाऱ्या लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो!
- कोजागिरी म्हणजे अश्विन महिन्यातील एक खास भेट!
- तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्ने या पूर्ण चंद्राप्रमाणे पूर्ण होवोत.
- सुख-दुःख विसरून आज रात्री एकत्र जागरणाचा आनंद घेऊया!
- कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
- आयुष्यातील प्रत्येक क्षण दुधासारखा गोड आणि चंद्रासारखा शीतल असो!
- कोजागिरी पौर्णिमा! आनंद, उत्साह आणि मांगल्य!
More From
-
41व्या वर्षी आई होणार बनू मैं तेरी दुल्हन फेम दिव्यांका त्रिपाठी! उशीरा गर्भधारणेत फॉलो करा या टीप्स -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा







Click it and Unblock the Notifications