Vinesh Phogat Net Worth: विनेश फोगाटकडे किती आहे संपत्ती? कॅश अन् कर्जाची रक्कम किती, वाचा सर्वकाही
Vinesh Phogat Net Worth: हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ओलिम्पियन आणि कुस्तीपटू विनेश फोगाट उतरली आहे. तिने जुलाना या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विनेशनाच्या निवडणूक शपथपत्रात तिनं आपल्या संपत्तीची माहिती दिलेली आहे. त्यानुसार,विनेशकडे चार वाहने असून काही रोख रक्कमही आहे.
विनेश फोगाट हिने कर्जही घेतलेलं असून त्यातील काही कर्जाची तिनं परतफेडही केलेली आहे. विनेश हिनं शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार, तिनं पस्तीस लाख रुपये किमतीची वोल्वो 160, होंडाई क्रेटा किंमत 12 लाख रुपये आणि टोयोटा इनोव्हा 17 लाख रुपये किंमत अशा तीन गाड्या तिच्याकडं असून एक स्कुटी ही तिच्याकडे आहे. या शिवाय तिच्या पतीकडं एक कार आहे.

विनेशने तिच्या इनोवा गाडीचं 13 लाख रुपयांचं कर्जही चुकतं केलं आहे. तिच्याकडं दोन कोटी रुपये रोख असून सोनीपत इथे तिचा एक प्लॉट सुद्धा आहे. निवडणुकीचा अर्ज भरला त्यावेळी दिलेल्या शपथपत्रांमध्ये या सर्व गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
विनेश हिचे पती सोमवीर राठी यांच्याकडे 19 लाख रुपयांची महिंद्रा स्कॉर्पिओ कार आहे आणि पतीची कमाई तीन लाख 44 हजार रुपये दाखवण्यात आलेली आहे. याशिवाय विनेशजवळील सोने, रोख रक्कम आणि बचत अशी एकूण एक कोटी दहा लाख रुपयांची संपत्ती आहे. निवडणूक शपथपत्रात विनेशने सांगितल्यानुसार तिच्याकडे 35 ग्रॅम सोने असून बाजारात याची किंमत जवळपास दोन लाख 24 हजार रुपये इतकी आहे. याशिवाय विनेश कडे 50 ग्राम चांदी असून ज्याची बाजारात चार हजार रुपये एवढी किंमत आहे.
याशिवाय पहेलवान विनेश फोगाटनं आंतरराष्ट्रीय उत्तम प्रदर्शन केला आहे पॅरिस ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यात तिने स्वतःचे स्थान पक्क केलं होतं परंतु केवळ शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे विनेशला तिथून अपात्र करण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशने कुस्ती या आपल्या प्रकारातून संन्यास घेतला होता.
भारतात परतल्यानंतर काँग्रेस नेते लीडर राहुल गांधी यांच्याशी विनेशना चर्चा केली होती आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी तिला काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश देण्यात आला. यावेळी तिचा सहकारी आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या विणेश फोगाट ही हरियाणाच्या जुलाना या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
नुकतेच विनेशने एक विधान केले होते, ज्यामध्ये तिने दावा केला होता की तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. त्यांनी आयओए अध्यक्ष पीटी उषा यांच्यावरही टीका केली होती. विनेशचा आरोप आहे की पीटी उषा यांनी तिला न सांगता हॉस्पिटलमध्ये गुपचूप फोटो काढला होता. नंतर तिने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून विनेशसोबत असल्याचे दाखवले होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जुलाना येथील जाहीर सभेला संबोधित करताना विनेश फोगट म्हणाली की, कुस्ती आपल्याला शिकवते की शत्रूला हलक्यात घेऊ नये. जुलानाचे लोक मला त्यांच्या सूनपेक्षा त्यांची मुलगी मानतात. विनेश चरखी दादरी जिल्ह्यातील बलाली येथील असून, तिचे सासर जुलाना येथे आहे. जुलाना येथील बख्ता खेडा हे विनेशचे पती सोमवीर राठी यांचे वडिलोपार्जित गाव आहे.












Click it and Unblock the Notifications