दहशतवादी पन्नूची अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी, व्हिडिओ जारी, म्हणाला- पाया संपवणार
Khalistani terrorist Pannu threatened to attack Ram Mandir : खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नूने अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे. त्याने एक व्हिडिओ जारी करुन धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील भारतीय वंशाचे हिंदू खासदार चंद्रा आर्य यांनाही पन्नू यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पन्नूने जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले की, अयोध्येच्या राम मंदिरात 16 आणि 17 नोव्हेंबरला हिंसाचार होणार आहे.

जारी केलेल्या व्हिडिओमध्ये पन्नू म्हणाला की, हिंदुत्व विचारसरणीची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचा पाया आम्ही हादरवून टाकू, असेही दहशतवादी पन्नूने म्हटले. व्हिडिओमध्ये पन्नूने अयोध्येतील राम मंदिरासह देशातील अनेक हिंदू मंदिरांची फोटो देखील दाखवले आहेत.
अन्यथा कॅनडा सोडा, पन्नूचा इशारा
दहशतवादी पन्नूने व्हिडिओमध्ये म्हटले की, भारतीय वंशाचे अनेक कॅनेडियन पीएम मोदींच्या विचारसरणीचे आहेत. तसेच कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य हे हिंदू दहशतवादाचा चेहरा आहेत. तुम्ही एकतर कॅनडाशी प्रामाणिक राहा किंवा कॅनडाची जमीन सोडा. दुसरीकडे,कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि कॅनडाच्या पोलिसांनी (RCMP) आधीच म्हटले आहे की प्रो खलिस्तानी शीख नेता हरदीपसिंग निज्जरची हत्या भारतानेच केली होती. यात भारतीय मुत्सद्दींचा हात होता, असा आरोप त्यांनी केला होता.
यापूर्वीही दोन वेळा मिळाल्या धमक्या
22 ऑगस्ट 2024- श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या हेल्पडेस्क मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे धमकी पाठवण्यात आली. 'लवकरच ते मंदिर नष्ट करतील आणि मशीद बांधतील..., मंदिर 4000 किलो आरडीएक्सने नष्ट केले जाईल...' असा धमकीवजा संदेश लिहिला होता. याप्रकरणी यूपी एटीएसने मोहम्मद मकसूद नावाच्या एका आरोपीला बिहारच्या भागलपूर येथून 14 सप्टेंबर रोजी अटक केली होती. सुरुवातीच्या चौकशीत मकसूद राम मंदिराच्या उभारणीवर चिडला होता.
28 मे 2024 - प्रथम एका आयडीवरून इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यानंतर 112 वर कॉल आला. राम मंदिर उडवण्याची धमकी मिळताच पोलिसांनी तत्काळ सायबर तज्ज्ञ आणि पाळत ठेवणारी टीम सक्रिय केली. दहशत टाळण्यासाठी पोलिसांनी अंतर्गत तपास केला. तपासादरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीचे ठिकाण कुशीनगर असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी धमकी देणाऱ्या बलुआ टाकिया परिसरात राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक तपासात ही अल्पवयीन मुलगी मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसल्याचे समोर आले आहे.
अयोध्यात एनएसजी कमांडो असणार
आता अयोध्येत नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) चे हब बनवले जाणार आहे. एनएसजीचे हे देशातील सहावे केंद्र असेल. सध्या NSG चे चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि अहमदाबाद येथे प्रादेशिक केंद्र आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक झाल्यानंतर दररोज सुमारे 1.5 लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत.अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून ते अनेक दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहे. अयोध्येतील NSG युनिट विशेष शस्त्रे आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा येथे वापर होणार आहे.












Click it and Unblock the Notifications