'RSSच्या शाखेत लैंगिक शौषण; अनेकदा झालेल्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या; या राज्यात खळबळ!

Kerala Software Engineers Suicide : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नुकताच शंभरावा वर्धापणदिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरसंघचालक यांनी या सोहळ्यानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तर देशभरासह विदेशातही संघाचे कार्यक्रम सुरू आहेत. अशातच, केरळ राज्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडवली आहे.

केरळमध्ये एका २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचा मृतदेह ९ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरममधील थंपनूर येथील एका लॉजमध्ये आढळला.

आत्महत्येपूर्वी, या तरुणाने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सदस्यांवर बालपणी लैंगिक आणि शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

Kerala Software Engineers Suicide

मृत तरुणाचे नाव व काय केला आरोप!

मृत तरुणाचे नाव आनंदू अजी असून, तो कोट्टायमचा रहिवासी होता. त्याने आपल्या चिठ्ठीत आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केले की, त्याच्या मृत्यूचे कारण अयशस्वी नातेसंबंध नसून, आरएसएसच्या सदस्यांकडून झालेले बालपणीचे 'खोल आघात' हे आहे. आनंदूने सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्याला लहानपणीच आरएसएसमध्ये दाखल केले होते. जिथे त्याला लैंगिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. त्याने 'एनएम' नावाच्या शेजाऱ्यावर आरोप केला आहे की, तो फक्त तीन वर्षांचा असल्यापासून त्याने त्याचे शोषण केले.आरएसएसच्या आयटीसी आणि ओटीसी कॅम्पमध्येही त्याच्यावर अशाच प्रकारचे अत्याचार झाले. लैंगिक शोषणाव्यतिरिक्त, कॅम्पमध्ये त्याला काठीने मारहाणही केली जात असे, असा गंभीर आरोप त्याने केला.

आरोग्यावर परिणाम आणि दुर्दैवी सत्य

काही वर्षांपूर्वी आनंदूला 'ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर' असल्याचे निदान झाले होते. पण, नंतर त्याला हे लक्षात आले की, ही मानसिक समस्या आरएसएसच्या सदस्यांकडून झालेल्या छळामुळे उद्भवली आहे. त्याने आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, "आरएसएसने त्याला आयुष्यभर वेदना दिल्या." आणि त्याचा राग एका व्यक्तीवर किंवा संघटनेशिवाय इतर कोणावरही नाही. मुख्य आरोपी 'एनएम' हा आरएसएसचा सक्रिय सदस्य होता, जो त्याचे सतत शोषण करत असे.

आरएसएसबद्दल तीव्र प्रतिक्रिया

आनंदू अजी यांनी आरएसएसच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने लिहिले की, "आरएसएसइतकी दुसरी कोणतीही संघटना द्वेषपूर्ण नाही" आणि बराच काळ या संघटनेशी जोडले राहिल्यानंतर त्याला हे स्पष्ट झाले.

इतकेच नाही तर त्याने लोकांना इशारा दिला की, "आरएसएस सदस्यांशी मैत्री करू नका, जरी ते तुमचे वडील, भाऊ किंवा मुलगा असले तरी, त्यांना दूर ठेवा."

आपल्यावरील शोषणाबद्दल बोलताना त्याने म्हटले, "कॅम्पमध्ये होणाऱ्या व्यापक शोषणाबद्दल मी बोलू शकलो. जरी माझ्याकडे पुरावे नसले तरी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु माझे जीवनच पुरावा आहे.

काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, आरएसएसने या गंभीर आरोपांवर उत्तर देणे आवश्यक आहे.

पालकांना आवाहन आणि पोलिसांची कारवाई

आत्महत्या करण्यापूर्वी, आनंदूने पालकांना त्यांच्या मुलांसोबत अधिक वेळ घालवण्याचा आणि त्यांच्यासोबत मजबूत संबंध निर्माण करण्याचा कळकळीचा सल्ला दिला आहे, जेणेकरून मुले भीतीपोटी गप्प बसू नयेत. "बालपणीचे आघात कधीच दूर होत नाहीत. जगात कोणत्याही मुलाला अशा वेदना सहन कराव्या लागू नयेत, असे त्याने लिहिले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की आनंदूने अत्याचाराची माहिती कोणालाही दिली नव्हती. कुटुंबातील एका सदस्यानेही सांगितले की, कुटुंबाला या घटनांबद्दल माहिती नव्हती आणि त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्या अलीकडेच उघड झाल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+