Kerala Lottery : बाब्वोव! 'या' तिकीटाने जिंकले 25 कोटी; बहुप्रतिक्षीत केरळ लाॅटरीचा निकाल लागला, पहा
Kerala Lottery : केरळच्या तिरुवोनम बंपर लॉटरीचे निकाल जाहीर झाले. वायनाडमध्ये विकल्या गेलेल्या तिकिटाला 25 कोटींचा जॅकपॉट लागला. तिकीट क्रमांक TG 434222 ने 2024 ची तिरुवोनम बंपर लॉटरी जिंकली आहे. लॉटरी चालवणाऱ्या राज्य लॉटरी विभागाने सांगितले की, विजेते अजून समोर आलेले नाहीत.
बथरी, वायनाड येथील एनजीआर या लॉटरीच्या दुकानाने विकलेल्या तिकिटाला पहिले 25 कोटींचे बक्षीस मिळाले. एनजीआर लॉटरीचे मालक नागराज आणि त्याचा भाऊ मंजुनाथ यांनी बुधवारी लाॅटरी जाहिर झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, या तिकीटाचा मालक अद्याप समोर आलेला नाही. तो लवकरच समोर येईल, असे सांगण्यात येते.

विक्रमी 72 लाख तिकीटांची विक्री
केरळच्या तिरुवोनम बंपर लाँटरीसाठी यावर्षी 80 लाख तिकिटे छापण्यात आली होती. त्यापैकी विक्रमी 71 लाख 43 हजार 008 तिकिटांची विक्री झाली होती. बुधवारी या लाँटरीची सोडत काढण्यात आली. अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी बुधवारी तिरुअनंतपुरम येथील गॉर्की भवन येथे आयोजित ड्रॉचे उद्घाटन केले.
तिरुवोनम बंपर लॉटरीच्या निकालावर केरळमधील सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात प्रत्येकी 20 विजेत्यांसाठी एक कोटींचे बक्षिस मिळाले. वीस विजेत्यांना प्रत्येकी एक कोटी रुपये हे या लाँटरीचे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस होते.
हे बक्षिस जिंकणारी तिकीटे पुढीलप्रमाणे-
- TA 507676 (पलक्कड)
- TB 220261 (तिरुवनंतपुरम)
- TB 749816 (तिरुवनंतपुरम)
- TD 281025 (1926C)
- TD 281025 (त्रिशूर)
- TE 340072 (पट्टांबी)
- टीई ३349095 (अदूर),
- टीई 488812 (पथनमथिट्टा)
- टीएच 815670 (थ्रिसूर)
- टीएच 111240 (पायन्नूर)
- टीएच 346533(करुणागपल्ली)
- टीएच 378331 (पलक्कड)
- टीएच 25 लम)
- टीएच56 लम)
- TJ 123040 (पुनालुर)
- TJ 201260 (मलप्पुरम)
- TJ 317658 (Irinjalakuda)
- TJ 432135 (थिरुवनंतपुरम)
- TJ 676984 (Neyyattinkara)
- TK 124175 (Neyyattinkara).
12 कोटींच्या लाँटरीचीही घोषणा
विजेत्याची ओळख पटल्यानंतर आणि औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, लॉटरी विभाग एजंटचे कमिशन आणि कर कापून बक्षीसाची रक्कम नियुक्त बँक खात्यात भरेल. विजेत्याना विजयावर अधिभार आणि उपकर देखील पाठवावे लागतील. अनेक लॉटरी विजेत्यांना कर आकारणीचे नियम आणि गुंतवणुकीच्या संधींबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे विभागाने 2023 मध्ये पारितोषिक विजेत्यांसाठी एक सत्र आयोजित केले होते. 25 कोटींच्या या लाॅटरीनंतर श्री बालगोपाल यांनी पूजा बंपर लॉटरी देखील लाँच केली आहे. ज्यामध्ये प्रथम बक्षीस म्हणून 12 कोटी आहे.












Click it and Unblock the Notifications