मोठी बातमी! केरळच्या कासारगोड मंदिर उत्सवात फटाक्यांचा स्फोट, 150 जखमी, 9 गंभीर, बघा VIDEO
Kerala Kasaragod Temple Firecrackers explosion : कासारगोड येथील मंदिर उत्सवादरम्यान फटाक्यांच्या आतीशबाजीत दुर्घटना घडली. केरळमध्ये या दुर्घटनेत 150 हून अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
या दुर्घटेतीस जखमींना तातडीने कासारगोड, कन्नूर आणि मंगळुरू येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात सोमवारी (28 ऑक्टोबर) रात्री उशिरा नीलेश्वरम येथील वीरकावू मंदिराजवळ घडला. फटाके फोडण्याच्या तयारीदरम्यान फटाक्यांच्या साठा असलेल्या परिसरात आग लागली.

कसा घडला अपघात?
रिपोर्टनुसार, मंदिराजवळ ठेवलेल्या फटाक्यांना अचानक आग लागल्याने हा अपघात झाला. मध्यरात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला, त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या अनेकांना त्याचा फटका बसला. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार या घटनेच्या कारणांचा कसून तपास केला जात आहे.
#Kasargod Firecracker room caught fire at veerakaav temple https://t.co/3tqCteOJXf pic.twitter.com/4TU0dkLZOb
— 𝖆𝖓𝖚𝖕 (@anupr3) October 28, 2024
प्रशासन आणि स्थानिक समुदायाकडून मदत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांसह जिल्हा प्रशासनातील उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यासोबतच तेथील स्थानिक लोकही पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. हा अपघात अत्यंत दु:खद असून त्यामागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसावा.












Click it and Unblock the Notifications