महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना आता दिल्लीतही; केजरीवालांची घोषणा, पहा किती पैसे देणार...
फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली लाडकी बहिण योजना आता दिल्लीलाही सुरु करण्यात येणार आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली.

दिल्लीतही लाडकी बहिण योजना
विधानसभेच्या पार्श्वभूमिवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहिण योजना लागू होणार आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. दिल्ली सरकारने आपले आश्वासन पूर्ण करत महिला सम्मान निधी योजनेला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दोन घोषणा केल्या. लाडकी बहिण योजनेतून दिल्ली सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणार आहे. दिल्ली सरकारच्या कॅबिनेट बैठकीत या योजनेच्या प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. 18 वर्षावरील सर्व महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे.
केजरीवालांनी केले निधीचे नियोजन
या योजनेबाबत अधिक माहिती देताना केजरीवाल म्हणाले की, "काही लोक बोलत होते की, हे होऊ शकत नाही. पण केजरीवाल जे ठरवतो, ते करुन दाखवतो. काही जण म्हणतात या योजनेसाठी पैसे कुठून येणार? मी भाजपवाल्यांना सांगेल की मी जादूगर आहे. मी अकाऊंट्सचा जादूगार आहे. पैसे कुठून आणायचे, हे मला माहित आहे. पैसे कुठे वाचवायचे आणि कुठे खर्च करायचे याची चिंता तुम्ही करु नका, असं म्हणत केजरीवाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दर महिन्याला हजार रुपये आजपासून सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.
पैसे वाढवून देण्याचेही आश्वासन
या योजनेबाबत अधिक माहिती देताना केजरीवाल म्हणाले की, "महिला कुटुंब चालवतात, मुलांना संस्कार देतात. मुलांना मोठं करतात. त्यांच्या कौटुंबिक कामात आम्ही हातभार लावू शकलो तर आम्ही स्वतःला सौभाग्यशाली समजू. या योजनेमुळे दिल्ली सरकारचा खर्च वाढणार नाही, तर दिल्ली सरकारची प्रगती होईल. आजपासून दिल्ली सरकारने हजार रुपये सुरु केलेत. निवडणुकीची घोषणा 10-15 दिवसांत होईल. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमध्ये लगेच पैसे जमा होणं शक्य नाहीय. मात्र ही योजना लागू झाली आहे. उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरु होईल, हिच रक्कम टप्प्याटप्प्याने 2100 रुपये होईल, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications