Karwa Chauth 2024 :करवा चौथला तुमच्या पत्नीला द्या खास गिफ्ट, प्रेम वाढेल अन् तुम्हाला सन्मान मिळेल
Karwa Chauth 2024 Give this special gift to your wife : भारतभर साजरा केला जाणारा महिलांचा सण म्हणजे करवा चौथ. या दिवशी महिला आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास करतात. हा सण परंपरेने भरलेला आहे. जोडप्यांसाठी प्रेम आणि भक्तीचा संगम असलेला हा सण भारतभर प्रसिद्ध आहे. पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देणारी संस्कृतीही या दिवशी जपली जाते. चंद्र उगवतो तसा सुवासिनींचा उपवासही संपतो.
करवा चौथला भेटवस्तूंचे महत्त्व
करवा चौथला पत्नीला दिली जाणारी भेटवस्तू ही भावनिकतेत गुंतलेली असते. भेटवस्तू निवडताना, प्रसंगाला अनुसरुन हृदयस्पर्शी वाटणारी एखादी वस्तू शोधा. काळजीपूर्वक निवडलेली भेटवस्तू आदर आणि प्रेम व्यक्त करते, सांसारिक गोष्टीला जादुई गोष्टीमध्ये बदलते. उदाहरणार्थ, अनेक जोडपे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या पारंपारिक वस्तू भेट देण्याचा आनंद घेतात. संपत्ती आणि नशीबाचे प्रतीक असलेले सुंदर लक्ष्मी चरण असोत किंवा घराला प्रकाश देणाऱ्या दिव्यांचा सेट असो, पत्नीला ते देतात. एखादी फोटो फ्रेम, पत्नीसाठी सुंदर साडी किंवा तिच्या सौभाग्याला शोभेल असा दागिनाही या दिवशी भेट देता येतो.

पत्नीची आवडही पहा
आपल्या पत्नीला नेमकं काय आवडतं, हे पतीला माहित असतं. पत्नीची आवडती वस्तू या दिवशी भेट म्हणून दिली तर त्याची मजा वाढते. पत्नीला परफ्यूम आवडत असेल तर तिला तिच्या आवडीच्या परफ्यूमचा सेट भेट म्हणून द्यावा. तिला हस्तकलेची आवड असेल, तर हस्तकलेची घरात ठेवता येणारी एखादी वस्तू द्या. पत्नीला मेकअप सेट, बांगड्या, ड्रेस आदींची भेटही या सणाला अजून आनंदी बनवते. पत्नीला दागिन्यांची आवड असेल तर आपल्या खिशाला परवडेल असा दागिनाही भेट देता येतो.
ग्रीटींग किंवा मिठाई वाढवते प्रेम
सणांच्या उत्सवात मिठाईला विशेष स्थान असते. गिफ्ट बॉक्समध्ये सुंदर पॅक केलेली एखादी मिठाईही पत्नीला गिफ्ट केली जाऊ शकते. त्याने नात्यातील गोडवा अजून वाढतो. शिवाय तिला फुलाचे एखादे ग्रीटींग कार्ड किंवा थेट फुलांचा बुकेही गिफ्ट देऊ शकता.
बाहेरचे जेवणही सणाला बनवेल खास
करवा चौथच्या दिवशी एखादी भेटवस्तू दिल्याने नात्यात प्रेम वाढतेच. मात्र या सणाला पत्नी आपल्या पतीसाठी उपवास करते. त्यामुळे हा तिचा उपवास बाहेर फिरायला नेऊन एखाद्या छानशा हाँटेलमध्ये तिला डिनर देऊनही सोडला जाऊ शकतो. तिला सरप्राईज वाटेल अशा सुंदर डिनरची योजनाही तुम्ही आखू शकता. भेटवस्तू देण्याच्या कृतीला प्रेमळ आठवणीत बदलू शकता.
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications