Karur Stampede : चेंगराचेंगरीत 39 मृत्यू! काय म्हणाला विजय थलपती? वाचा PM मोदींची प्रतिक्रीया

Karur Stampede 39 Dead at Vijay Thalapathy's Rally : तामिळ अभिनेता विजय थलपती याच्या करुर येथे झालेल्या सभेदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आतापर्यंत तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हुन अधिकजण जखमी झाले आहेत. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मोठ्या दुर्घटनेनंतर आता विजय थलपती समोर येऊन बोलला आहे तर या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

विजय थलपती हा दाक्षिणात्य खासकरुन तामिळ अभिनेता त्याच्या खास अदाकारीमुळे आणि गाजलेल्या चित्रपटामुळे खूपच प्रसिद्ध आहे. त्याने सिनेसृष्टीसोबतच आता राजकीय क्षेत्रात पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्याने तमिझगा वेत्री कळगम हा पक्ष स्थापन केला आहे.

Karur Stampede 39 Dead at Vijay Thalapathy s Rally

तामिळनाडूतील आगामी निवडणुकीच्या धर्तीवर त्याने जोरदार तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या अनुशंगाने त्याची करुर येथे सभा होती. या सभेला तुफान गर्दी झाली होती, गर्दी नियंत्रित न झाल्याने येथे चेंगराचेंगरी झाली. वृत्तानुसार, आतापर्यंत कमीत कमी 39 जण ठार झाले आहेत.

Take a Poll

विजय थलपती याची प्रतिक्रीया

विजय थलपतीने या दुर्घटनेनंतर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. घडलेल्या घटनेमुळे माझ्या मनाला खूप वेतना झाल्या आहेत. एक्स या सोशल मीडियावरील स्वःतच्या अकाऊंटवर थलपतीने प्रतिक्रीया दिली आहे. त्यानुसार, विजय थलपतीने जखमींची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली, यासंदर्भात त्याची पोस्ट अशी आहे...

"माझे हृदय तुटले आहे; मी असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखात आहे. करूरमध्ये जीव गमावलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून सहानुभूती आणि संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांच्या लवकर बरे होण्याची मी प्रार्थना करतो."

पंतप्रधान मोदीनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया अकाऊंट एक्सवर या घटनेवर आपली प्रतिक्रीया दिली ते म्हणाले, "तामिळनाडूतील करूर येथील राजकीय सभेदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझे विचार आहेत. या कठीण काळात त्यांना शक्ती मिळो अशी प्रार्थना. जखमी झालेल्या सर्वांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+