Karnataka Riots: गणपती विसर्जनावेळी कर्नाटकात दगडफेक, जाळपोळ अन् आज आंदोलन वाचा आत्तापर्यंत काय घडलं
Karnataka Riots : कर्नाटकातील मंड्या येथे बुधवारी गणपती विसर्जनावेळी दोन गटात हाणामारी झाल्यानंतर तणाव वाढला. यानंतर दगडफेक झाली, पोलिसांना बळाचा वापरही केला. त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आज नागमंगला बंदची हाक दिली आहे. या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन मंगळुरूमध्ये आंदोलनाचे आवाहन केले होते. त्यानंतर आज तिथे आंदोलन सुरु असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.

यादरम्यान दक्षिण कन्नडचे एसपी यतीश एन एनआयशी म्हणाले, "आज, ईद-ए-मिलाद सणाच्या पूर्वसंध्येला, आम्ही जिल्ह्याभोवती चोख व्यवस्था केली आहे आणि बीसी रोडवरील बंटवाल शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली त्यापार्श्वभुमीवर आम्ही पुरेशी व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात कुठेही घटना घडू नये याची खबरदारी घेत आहोत.
#WATCH | Karnataka: Yatish N, SP of Dakshina Kannada says, "Today, on the eve of Eid-e-Milad festival, we have made adequate arrangements around the district and there was a call for a protest in Bantwal town on BC Road, for which we have made adequate arrangements. We are… pic.twitter.com/tNMLQsGRKj
— ANI (@ANI) September 16, 2024
काय घडला होता प्रकार...
कर्नाटकातील मंड्या येथे गणेश मिरवणुकीदरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीमुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला होता. बदरीकोप्पलू येथून दोन गणेश मूर्ती विसर्जनासाठी भाविक घेऊन जात होते. त्यावेळी ही मिरवणूक धार्मिक स्थळी पोहोचताच काही हल्लेखोरांनी दगडफेक केल्याने दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर दोन्ही गटांनी धार्मिक घोषणा देण्यास सुरुवात केली.
हा गोंधळ एवढा वाढला की, तिथे दगडफेक करण्यात आली तसेच तेथील दुकाने आणि कपड्यांची तसेच दुचाकी शोरूमला आग लावण्यात आली, दुचाकीही जाळण्यात आल्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.
हे होते मुळ कारण
वास्तविक, बदरीकोप्पलू गावातील तरुण गणेश विसर्जनासाठी मिरवणूक काढत होते. ही मिरवणूक नागमंगला मुख्य मार्गावरील एका धार्मिक स्थळाजवळून गेली. यादरम्यान मिरवणुकीवर दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती चिघळली आणि दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यावर संतप्त दुसऱ्या गटाने पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करत जबाबदारांना अटक करण्याची मागणी केली. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आज नागमंगला येथे बंदची हाक दिली आहे.
#WATCH | Karnataka: Vishwa Hindu Parishad and Bajrang Dal workers stage protest in Mangaluru over a social media post; police personnel deployed pic.twitter.com/4NUkreU9KQ
— ANI (@ANI) September 16, 2024
50 संशयितांना अटक
दंगलप्रकरणात पोलिसांनी 52 जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अटक केलेल्यांचे नातेवाईकांनी कोणतेही कारण नसताना आमच्या मुलांना अटक करण्यात आली असा आरोप केला दरम्यान, चौकशीसाठी आणलेल्यांत जो कोणी निर्दोष असेल त्याला सोडण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हायअलर्ट जाहीर
एसपीच्या म्हणण्यानुसार परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आपल्याकडे पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. यात कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही. केवळ काही जणांना किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी परिसरात हाय अलर्ट जाहीर केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications