मोठी बातमी! महाराष्ट्र कर्नाटक बससेवा 'या' दिवशी होणार सुरु; कर्नाटकच्या कलेक्टरांनी दिली माहिती
अगोदर महाराष्ट्रातील व नंतर कर्नाटकच्या बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बससेवा बंद करण्यात आली होती. या दोन्ही राज्यांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातून दोन्ही राज्यांनी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. बससेवा बंद असल्याने दोन्ही राज्यातील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता ही बससेवा २७ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापर्यंत अशीच राहणार आहे. दरम्यान, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या बससेवेबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला.

काय म्हणाले कलेक्टर?
महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा कधी सुरु होईल, असे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, "दोन्ही राज्यांमधील बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत आम्ही कोल्हापूरचे उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली. बससेवा दोन-तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. दोन्ही पोलीस अधीक्षकांनी आमच्या सीमेवर आणि महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा वाढवण्यावर सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आम्ही येत्या काही तासांत सुरळीत बस सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. २७ फेब्रुवारीच्या दुपारपासून महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेनं पूर्वीप्रमाणे बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केल्या आहेत."
महाराष्ट्राशी झाली चर्चा
जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की, "कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी बोलणे केले आहे. आमचे डीजीपी महाराष्ट्राच्या डीजीपींशी बोलले आहेत. केवळ बेळगाव आणि कोल्हापूरमध्येच नव्हे तर सांगली आणि सोलापूरमध्ये जिथे जिथे अप्रिय घटना घडल्या, तिथे योग्य सुरक्षा पुरवली पाहिजे. कर्नाटकच्या विविध भागात सुरक्षा पुरवण्याबाबत त्यांनी उच्च स्तरावर चर्चा केली आहे. मुख्य सचिव हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देतील," ही माहितीही कलेक्टर रोशन यांनी दिली.
उद्यापासून बससेवा सुरु
सध्या कर्नाटकातील बेळगावातून संकेश्वर व निपाणीपर्यंत ६४ बस धावल्या. मात्र महाराष्ट्रातील प्रवाशांना तेथे सोडून देण्यात आले. महाराष्ट्रातील प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य परिवहन बसचा वापर करुन आपला पुढील प्रवास केला. मात्र उद्या दुपारपर्यंत दोन्ही राज्यातील प्रशासनाने बसची सुरक्षेची काळजी घेण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच गुरुवारी दुपारपर्यंत या दोन्ही राज्यातील बससेवा पूर्ववत होईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दोन्ही राज्यांमधील बससेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सोमवारी बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची आणि पोलीस अधीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. त्यामध्ये तपशील ठरवण्यात आला आणि उद्यापासून बससेवा पूर्ववत सुरू होत आहे.












Click it and Unblock the Notifications