Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Jyoti Malhotra News: 34 वर्षांची ज्योती मल्होत्रा अजूनही अविवाहित का आहे? तिचं कोणावर प्रेम आहे का?

पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली यूट्यूबर ज्योति मल्होत्रा ऊर्फ ज्योति राणी ही सध्या एनआयएच्या चौकशीत आहे. मूळची हरियाणाच्या हिसारमधील रहिवासी असलेल्या ज्योतीबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. ती खरंच पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संपर्कात होती का, याचा तपास सुरू आहे.

jyoti malhotra love story

ग्लॅमरस ज्योती खरंच देशद्रोही आहे का?

ज्योती मल्होत्राच्या यूट्यूब चॅनलवर 1.39 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या मोहक आणि ग्लॅमरस व्हिडीओंमुळे प्रसिद्ध झालेली ही युवती देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत आली आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की कॅमेऱ्यासमोर हसतमुख आणि आत्मविश्वासपूर्ण दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात देशाच्या विरोधात काम करत होती का?

कुटुंबाची वेदनादायक कहाणी

ज्योती सध्या आपल्या वृद्ध वडिलांसोबत व चुलत्यासोबत हिसारमध्ये राहत होती. तिची आई 20 वर्षांपूर्वी तिला एका बालगृहात टाकून निघून गेली होती. वडील हरीश मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माझं आणि पत्नीचं पटत नव्हतं. ज्योतीच्या जन्मानंतर एक दिवस ती घर सोडून गेली आणि माझ्या मुलीला बालगृहात टाकून आली. मी तिची माहिती मिळाल्यावर तिला पुन्हा घरी आणलं."

हरीश यांनी पूर्वी सुतारकाम आणि पेंटिंगचं काम केलं पण आता दृष्टी कमजोर झाल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. चुलते खुशहाल चंद हे विजेच्या विभागात फोरमॅन होते आणि आता निवृत्त आहेत. त्यांची पेन्शन व ज्योतीच्या यूट्यूब उत्पन्नावर घर चालत होते. हरीश म्हणाले, "मी कधी तिचे व्हिडीओ पाहिले नाहीत. माझ्याकडे व्हिडीओ पाहण्यासाठी मोबाईल नाही."

34 वर्षांची असूनही अजून अविवाहित का?

ज्योती अजूनही अविवाहित आहे. यावर वडील म्हणाले, "मी तिला अनेकदा लग्नासाठी सांगितलं, पण ती नेहमी टाळाटाळ करत असे. तिला लग्नात अजिबात रस नव्हता. मी तिला विचारलं की कुणावर प्रेम आहे का, कुणाला पसंत करते का, तर ती काहीच सांगायची नाही."
त्यांनी सांगितलं की ज्योती अनेकदा सांगायची की ती दिल्लीला जात आहे, पण नंतर 3-4 दिवसांनी परत यायची. मात्र नंतर कळालं की ती पाकिस्तानमध्ये गेली होती.

'पाकिस्तानमध्ये भारतीय मुलगी' या व्हिडीओने वाढवली उत्सुकता

ज्योतीने 2023 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानला भेट दिली होती. हे प्रवास एजंटच्या माध्यमातून व्हिसा मिळवून घडले होते. तिच्या दुसऱ्या भेटीत, दोन महिन्यांपूर्वी, तिने 'ट्रॅव्हल विथ JO' या यूट्यूब चॅनलवर "पाकिस्तानमध्ये भारतीय मुलगी" आणि "लाहोरची सफर करणारी भारतीय मुलगी" अशा शीर्षकांचे व्हिडीओ अपलोड केले.

एक लाखाहून अधिक सर्चेस एका दिवसात

माध्यमातील बातम्यांनुसार, गेल्या 24 तासांत 1 लाखांहून अधिक लोकांनी Google वर ज्योती मल्होत्राबद्दल शोध घेतला आहे. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप तपासणीसाठी करनाल येथील एफएसएल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.

खरंच गुप्तहेर? की एक सामान्य व्ह्लॉगर?

तिचे पाकिस्तानमधील उच्चायोगाच्या कर्मचाऱ्यांसोबत आणि मरियम नवाजसारख्या नेत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ती खरंच पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करत होती का, याचं उत्तर तपास पूर्ण झाल्यावरच मिळेल. सध्या मात्र तिचं आयुष्य आणि तिच्या निवडी सार्वजनिक चर्चेचा विषय बनल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+