Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जस्टीस संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायधीश होणार! जाणून घ्या कारकीर्द आणि जीवनगाथा

Justice Sanjeev Khanna appointed as Next CJI of Supreme Court : न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशपदी नियुक्ती झाली आहे. ते देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून 11 नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

विद्यमान सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनीच सरन्यायधीशपदासाठी केंद्र सरकारकडे जस्टीस संजीव खन्ना यांची शिफारस केली होती. आता केंद्र सरकारनेही याला मंजुरी दिली आहे. संजीव खन्ना यांनी कलम 370 हटवणे योग्य असल्याचे म्हटले होते; त्यांचा कार्यकाळ 6 महिन्यांचा राहणार आहे.

Justice Sanjeev Khanna appointed as Next CJI of Supreme Court

14 मे 1960 रोजी जन्म

खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला, कायदेशीर कारकीर्द दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून पदवी घेतल्यानंतर सुरू झाली. यानंतर, 1983 मध्ये त्यांची दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी झाली. आपल्या व्यावसायिक प्रवासात, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांनी 14 वर्षे दिल्ली उच्च न्यायालयात काम केले.

1983 मध्ये वकील म्हणून नोंदणी

वरिष्ठ न्यायधीश संजीव खन्ना यांनी 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी केली. सुरुवातीला तीस हजारी कॉम्प्लेक्स, दिल्ली येथील जिल्हा न्यायालयांमध्ये आणि नंतर दिल्ली उच्च न्यायालय आणि न्यायाधिकरणांमध्ये घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कर आकारणी, लवाद, व्यावसायिक कायदा, कंपनी कायदा, जमीन कायदा, पर्यावरण कायदा आणि वैद्यकीय निष्काळजीपणा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपली वकीली केला.

आयकर विभागाचे वरिष्ठ स्थायी वकील म्हणून त्यांचा दीर्घ कार्यकाळ होता. 2004 मध्ये, त्यांची राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे स्थायी सल्लागार (सिव्हिल) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील आणि ॲमिकस क्युरी या नात्याने अनेक फौजदारी खटल्यांमध्ये हजर राहून युक्तिवाद केला आहे.

उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती

2005 मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि 2006 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, त्यांनी दिल्ली न्यायिक अकादमी, दिल्ली आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आणि जिल्हा न्यायालय मध्यस्थी केंद्रांचे अध्यक्ष/न्यायाधीश-प्रभारी पद भूषवले.

अशी आहे कारकीर्द

  • 18 जानेवारी 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती.
  • 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपद भूषवले.
  • ते सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत.
  • संजीव खन्ना हे पुढच्या वर्षी म्हणजेच 13 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

व्हीव्हीपीएटी पडताळणीची याचिका फेटाळण्यापासूनते कलम 370 न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची कारकीर्द आव्हानांत्मक राहिली. न्यायमूर्ती खन्ना यांच्या कार्यकाळात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स वि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रकरणात 100% व्हीव्हीपीएटी पडताळणीची याचिका फेटाळण्यापासून ते कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाशी सहमत होण्यापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.

संजीव खन्ना, हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना, हे सर्वोच्च न्यायालयाचे 51 वे सरन्यायाधीश असतील, त्यांनी एक गौरवशाली कारकीर्द घडवली आहे, ज्यात सुमारे 275 खंडपीठ आणि 65 निवाड्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे. या प्रतिष्ठित पदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+