Jio Launches Powerful 40 Plan :रोजचा डेटा संपला? नो टेन्शन! Jio चा भारी प्लॅन, 40 रुपयात 'एवढा' डेटा
Jio Launches Powerful 40 Plan : वेगवान डिजिटल युगात, इंटरनेटशिवाय एका दिवसाची कल्पना करणेही अशक्य आहे. ऑनलाइन शिक्षण, कामाच्या महत्त्वाच्या बैठका किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग, प्रत्येक गोष्ट डेटावर अवलंबून असते. मात्र, जेव्हा दिवसाची डेटा मर्यादा (Daily Data Limit) अचानक संपते आणि इंटरनेटचा वेग मंदावतो, तेव्हा अनेक महत्त्वाची कामे मध्येच थांबतात.
ही बाब लक्षात घेऊन रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी उपाय घेऊन आले आहे. जर तुम्हाला तातडीच्या वेळी डेटाची गरज असेल आणि तुमचा रोजचा डेटा संपला असेल, तर जिओचा हा ४० रुपयांचा नवीन 'डेटा ॲड-ऑन' प्लॅन जारी केला आहे, यासंदर्भात gizbot.com ने वृत्त दिले आहे.

तुम्हीही याच समस्येशी झगडत असाल आणि तातडीच्या वेळी) त्वरित डेटाची गरज असेल, तर रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत स्वस्त आणि प्रभावी प्लॅन घेऊन आले आहे, जो तुमची डेटाची चिंता लगेच दूर करेल.
३ दिवसांच्या वैधतेत ९GB बंपर डेटा
- जिओचा हा प्लॅन फक्त ₹४० मध्ये उपलब्ध आहे.
- यामध्ये तुम्हाला ३ दिवसांच्या वैधतेसाठी (Validity) दररोज ३GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
- या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना एकूण ९GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध होतो.
- ज्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी, ऑनलाइन क्लाससाठी किंवा प्रवासादरम्यान थोड्या कालावधीसाठी अधिक डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन एकदम योग्य आहे.
एअरटेलच्या प्लॅनला तगडी टक्कर
- जिओचा हा प्लॅन एअरटेलच्या एका डेटा प्लॅनला थेट टक्कर देत आहे.
- कंपनी प्लॅनची किंमत डेटा वैधता
- जीओ ₹४० ९GB (३ दिवसांसाठी) ३ दिवस
- एअरटेल ₹३३ २GB १ दिवस
एअरटेलच्या ३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये फक्त १ दिवसाच्या वैधतेसह २GB डेटा मिळतो. याच्या तुलनेत, जिओचा ४० रुपयांचा प्लॅन ३ दिवसांसाठी ९GB डेटा देत असल्याने, तो अधिक प्रभावी आणि किफायतशीर ठरतो.
रिचार्ज कसा कराल?
हा प्लॅन तुम्ही थेट MyJio App किंवा जिओच्या अधिकृत वेबसाइटवर 'डेटा ॲड-ऑन' (Data Add-on) विभागात शोधू शकता.
हा प्लॅन तुमच्या सध्याच्या मूळ प्लॅनची वैधता (व्हॅली़डीटी) वाढवत नाही; तो फक्त तुमच्या डेटाची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहे.
या प्लॅनमुळे आता, रोजची मर्यादा संपल्यावर तुम्हाला काम मध्येच थांबवण्याची गरज पडणार नाही.












Click it and Unblock the Notifications