झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन यांची लाट, इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत, एनडीला पुन्हा धक्का
Jharkhand Assembly Election Result 2024- झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु झाली. सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या निवडणुकांच्या कलावरुन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पुन्हा लाट असल्याचे चित्र दिसले. इंडिया आघाडी व एनडीए यामध्ये येथे सरळसरळ लढत झाली. आत्तापर्यंतच्या निकालाच्या कलावरुन इंडिया आघाडीने बहुमता आकडा पार केला आहे. एनडीएला ३० पेक्षा कमी जागा मिळाल्याचे चित्र आहे.

इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत
इंडिया आघाडीने झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिष्ट पार्टी यांनी एकत्रितपणे ही निवडणुक लढवली होती. भाजपच्या एनडीएत भाजपससह आजसू व संयुक्त जनता दल होते. निवडणूक आयोगाने सकाळी साडेदहा वाजता जाहिर केलेल्या अधिकृत आकडेवारीत सर्व ८१ जागांचे कल समजले. त्यात सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला ३२ जागांवर आघाडी मिळाली. मित्रपक्ष काँग्रेस १२ जागांवर तर आरडेडी सहा जागांवर व कम्युनिष्ट दोन जागांवर आघाडी मिळाली. आघाडीने बहुमताचा ४१ हा आकडा पार केला आहे.
एनडीला पुन्हा नाकारले
एनडीएत भाजपचे २५ उमेदवार आघाडीवर होते. तर आजसू पक्षाचे दोन व जनता दलाचा एक उमेदवार आघाडीवर होता. त्यामुळे एनडीएला पुन्हा जनतेने नाकारल्याचे चित्र दिसले. येथे पुन्हा हेमंत सोरेन यंची जादू चालल्याचे दिसले.












Click it and Unblock the Notifications