Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

झारखंडचं जागावाटप ठरलं..! भाजप, झामुमो, राजद, काँग्रेसला किती जागा? पहा सविस्तर माहिती

झारखंड विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला तेथे निवडणूका होणार आहेत. दोन टप्प्यात त्या घेण्यात येणार असल्याने सर्वच पक्षांनी आपली रणनिती तयार केली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षामध्ये जागा वाटपाचा फाँर्म्यूला ठरल्याचीही माहिती समोर येत आहे.

झामुमो लढवणार सर्वाधिक जागा

झारखंडच्या जागावाटपासाठी आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाच सर्वाधिक जागा लढविणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. झामुमोला ४३ जागा, काँग्रेसला २९ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाला पाच जागा तर भारतीय कम्युनिष्ट पार्टीला चार जागा मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आजच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Jharkhand Assembly Election 2024

लालूप्रसाद घेणार अंतिम निर्णय

जागा वाटपाच्या बैठकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने अधिक जागा मिळण्यासाठी दबावतंत्र वापरले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत या पक्षाने २२ जागांवर दावा केलाय. यावर निर्णय घेण्याचा अधिकार लालूप्रसाद यादव यांना देण्यात आलाय. राजदला फक्त ४ जागा ऑफर करण्यात आल्याने आजच्या बैठकीत काय होतंय, हे समजणार आहे.

भाजप 69 जागा लढवण्याची शक्यता

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप 69 जागांवर निवडणूक लढवेल. जदयूला 2 जागा, आजसूला 9 जागा मिळतील. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पार्टीला एक जागा मिळू शकते. मित्र पक्षांची अजून काही जागा मिळण्यासंदर्भात मागणी आहे. जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+