ठरलं तर..!हेमंत सोरेन 'या' दिवशी घेणार शपथ; राज्यपालांना भेटून केली 'ही' मागणी

Hemant Soren Swearing In Ceremony- झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्च्याने बंपर विजय मिळवला. त्यानंतर आता हेमंत सोरेन हे झारखंडचे नवे मुख्यमंत्री होतील, हे निश्चित झाले. त्यांचा शपथविधी 28 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले. हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, आता ते नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विधानसभेच्या 81 जागांपैकी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने 56 जागा जिंकल्या आहेत.

Hemant Soren

सोरेन यांनी घेतली राज्यपालांची भेट

झारखंड विधानसभेसाठी 41 च्या बहुमतापेक्षा गरज होती. मात्र झारखंड इंडिया आघाडीने तब्बल 56 जागा जिंकत बहुमताच्या आकड्यापेक्षा 15 जागा जास्त मिळवल्या. सोरेन यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, "नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबरला होईल. आज आम्ही इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या संदर्भात आम्ही राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मी त्यांना माझा राजीनामाही दिला आहे. काँग्रेस आणि आरजेडीचे प्रभारीही येथे उपस्थित होते.

सलग दुसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री

विजयानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या जनतेचे आभार मानले. इतर मित्रपक्षांचेही त्यांनी आभार मानले. झामुमोच्या विजयाने राजधानी रांचीच्या पोस्टरबाजीही करण्यात आली. शेरदिल सोरेन पुन्हा आले, अशा आशयाची पोस्टर्स रस्त्यांवर झळकली. हेमंत सोरेन हे झारखंडचे हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील. असा पराक्रम करणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत.

काँग्रेस नेत्यांना होती विजयाची अपेक्षा

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत सोरेन यांची भेट घेतली. झारखंड काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेश ठाकूर म्हणाले, 'याआधीही आमचे सरकार संकटात असताना आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने सरकार स्थापन करू असे सांगितले होते. आम्ही पुन्हा एकदा पूर्ण विश्वासाने सरकार स्थापन करणार आहोत. हा विजय आमचाच होता असे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+