Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हेमंत सोरेन यांना हरवण्यासाठी उमेदवारांना भाजपकडून 5 कोटींची ऑफर; JMM नेत्याचा दावा

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर या राज्यात भाजपकडून मोठी रणनीती आखली जात आहे. हेमंत सोरेन यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले नाही पाहिजे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांच्याविरोधात ताकदीचा उमेदवार उभ्या करण्यासाठी भाजपकडून मेगा प्लॅन केला जात आहे. अशातच झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेते मनोज पांडे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष (BJP) मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराला 5 कोटी रुपयांची ऑफर देत आहेत,असा दावा त्यांनी केला.

JMM नेते मनोज पांडे यांनी रविवारी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, भाजपला बरहेत विधानसभा जागेवर एकही उमेदवार सापडलेला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की बरहेत विधानसभा जागा JMM चा बालेकिल्ला आहे आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन या जागेवरून सतत विजयी होत आहेत आणि यावेळी देखील ते उमेदवार असून त्यांचा विजय नक्की होईल.

Jharkhand Assembly Election 2024

भाजपला उमेदवार मिळेना

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मनोज पांडे म्हणाले की, भाजप उमेदवार शोधत आहेत, तरीही योग्य उमेदवार शोधू शकले नाहीत. आम्हाला माहिती मिळाली आहे की त्यांनी आता कोणत्याही उमेदवाराला आकर्षित करण्यासाठी पक्षात 5 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. पैशाचे आमिष दाखवून कोणाला राजकीय शहीद व्हायला वाटणार?,असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

बरहेतमध्ये भाजपला दीडशे मतही मिळणार नाही

मनोज पांडे म्हणाले की, बरहेत मतदारसंघात शे-दीडशे मत देखील मिळणार नाहीत, हे भाजपला माहीत आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात कोणताही उमेदवार निवडणूक लढवू इच्छित नाही. भाजपच्या उमेदवाराला केवळ 250 मते मिळाली तर ते किती अपमानास्पद असेल. त्यामुळे मला वाटते की ते या जागेवरून एकही उमेदवार उभे करणार नाहीत अन्यथा, पैशाच्या लोभापोटी कोणीतरी उमेदवार अर्ज भरेलही, पण त्याला यश मिळणार नाही हे खरं आहे.

बरहेत विधानसभेतून सोरेन यांनी भरला अर्ज

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बरहेत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर त्यांच्या आमदार पत्नी कल्पना सोरेन यांनी गंडेया विधानसभा मतदारसघांतून उमेदवारी अर्ज दाखल केला. बारहेत हे संथाल परगणा प्रदेशात येते, जो झारखंड मुक्ती मोर्चाचा (जेएमएम) गड मानला जातो. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, हेमंत सोरेन यांनी संथाल प्रदेशातील बारहेत आणि दुमका या दोन विधानसभा जागांवर निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या.

त्यांनी बरहेत जागेवर भाजपच्या सायमन माल्टो यांचा 25,740 मतांनी पराभव केला आणि दुमका जागेवर भगवा पक्षाच्या लोइस मरांडी यांचा 13,188 मतांनी पराभव केला. नंतर त्यांनी दुमका सीट सोडली. 81 सदस्यीय विधानसभेसाठी 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर 20 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+