Jharkhand Assembly Election : "RSS उंदरांसारखे.!", सोरेन यांचे वक्तव्य, भाजपने 'हा' केला पलटवार वाचा
Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) 'उंदीर' असे वर्णन करत टीकास्त्र सोडलं. यावरुन आता राजकारण चांगलंच गरम झालं असून भाजप नेत्यांनी या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत आपला संताप व्यक्त केला आहे.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून विविध नेत्यांच्या सभा,प्रचार दौरेही होत आहे. राजकीय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता मुख्यमंत्री सोरेने यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत.

नेमकं काय म्हणाले सीएम सोरेन?
साहिबगंजमध्ये एका रॅलीला संबोधित करताना आरएसएस झारखंडवर हल्ला करत आहे झारखंडवर उंदरांसारखे हल्ले करून त्याचा नाश करत आहे. सीएम हेमंत सोरेन म्हणाले की, "जेव्हा तुम्ही पाहाल की या फौजा हाडे आणि दारू घेऊन तुमच्या गावात घुसत आहेत, तेव्हा त्यांना हाकलून द्या."
तणाव निर्माण केल्याचा भाजपवर आरोप
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी भाजपवर हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये मतभेद निर्माण करून निवडणुकीपूर्वी जातीय अशांतता आणि तणाव निर्माण केल्याचा आरोप केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याकडे बोट दाखवत सीएम सोरेन यांनी हे विधान केले आहे.
झारखंडमधील लोकसंख्या बदलाचे आरोपही सोरेन यांनी फेटाळून लावले तसेच आरोप फेटाळले आणि समीक्षकांनी शेजारील राज्य पश्चिम बंगालच्या लोकसंख्याशास्त्रीय डेटाकडे लक्ष द्यावे असे भाजपला सुचवले.
भाजपचे प्रत्युत्तर
हेमंत सोरेन हे संथाल परगणामध्ये घुसून जमीन बळकावणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांसंदर्भात मौन बाळगून आहेत, असे भाजपने म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनवाला म्हणाले, "झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन राष्ट्रभक्त आणि जनतेने निवडून दिलेल्या लोकांना 'उंदीर' संबोधतात. पण ते स्वत: संथाल परगण्यात घुसून जमीन बळकावणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांबद्दल काहीही बोलत नाहीत, कारण ते त्यांचेच आहे अशी टीका त्यांनी केली. तसंच त्यांचा संबंध व्होट बँकेशी आहे असाही आरोप केला आहे.












Click it and Unblock the Notifications