झारखंड विधानसभा निवडणूक, एजएसयूच्या यादी जाहीर; वाचा- कुणाला मिळाली उमेदवारी
NDA Ally AJSU releases First List 8 Candidate : झारखंडमधील एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या एजेएसयू पक्षाने रविवारी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सिल्ली येथून पक्षाचे सुप्रीमो सुदेश कुमार महतो यांना उमेदवारी मिळाली आहे. झारखंड विधानसभेसाठी २३ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८१ जागांसाठी सध्या येथे घमासाना सुरु आहे. एजेएसयूने भाजपसोबत हातमिळवणी करत या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. 81 सदस्यीय झारखंड विधानसभेसाठी 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
एनडीएत चार पक्षांची युती
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएत भाजपसह चार पक्ष एकत्रित निवडणूक लढविणार आहेत. जागावाटपानंतर दोन दिवसांपूर्वी भाजपने आपली पहिली यादीही जाहीर केली. जागावाटपानुसार भाजपला ६८ जागा, ऑल झारखंड स्टुडंट युनिअनला (एजेएसयू) १० जागा, जनता दलला (युनायटेड) दोन जागा तर एलजेपीला एक जागा देण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार यादीनंतर एजेएसयूने आठ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पक्षाचे सुप्रिमो महतो यांच्या नावाचाही समावेश आहे. महतो यांनी 2019 मध्ये सिल्ली विधानसभेची जागा 20,195 मतांच्या फरकाने जिंकली होती. त्यावेळी त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या सीमा देवी यांच्या पराभव केला होता.

असे आहेत एजेएसयूचे उमेदवार
1. सुदेश कुमार महतो: सिल्ली विधानसभा
2.सुनीता चौधरी: रामगढ विधानसभा
3. नीरू शांति भगत: लोहरदगा विधानसभा
4. लंबोदर महतो: गोमिया विधानसभा
5. रामचंद्र सहिस: जुगसलाई विधानसभा
6. निर्मल महतो: मांडू विधानसभा
7. हरेलाल महतो: इच्छागढ़ विधानसभा
8. अजहर इस्लाम: पाकुड़ विधानसभा












Click it and Unblock the Notifications