झारखंडमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयाचा वाद ? भाजपाने केली उमेदवारी रद्द करण्याची मागणी
Jharkhand Assembly Election 2024 : झारखंड विधानसभेच्या निवडणूक प्रचाराला आता चांगलीच रंगत आली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वयावरून वाद सुरू झाला आहे. हेमंत सोरेन यांचे वय गेल्या पाच वर्षांत सात वर्षांनी वाढल्याचा आरोप भाजपने केला आहे. हेमंत सोरेन यांनी 2019 मध्ये त्यांचे वय 42 असल्याचं आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. परंतु यावर्षी त्यांनी त्यांचे वय 49 असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री सोरेनवर टीका करताना भाजपचे प्रवक्ते प्रतुल शाह देव यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या ट्टिटमध्ये म्हटलं आहे की "तुम्ही कधी ऐकले आहे की पाच वर्षांत एखाद्याचे वय 7 वर्षांनी वाढले आहे? झारखंडमध्ये असे होऊ शकते." असं ट्टिट करण्यात आलं आहे. हेमंत सोरेन यांचा उमेदवारी अर्ज आता रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधातही तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारी रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
कभी सुना है 5 वर्षों में किसी की उम्र 7 वर्ष बढ़ने की बात।
— Pratul Shah Deo🇮🇳 (@pratulshahdeo) October 31, 2024
It can happen in Jharkhand.#Elections #HemantSoren
भाजपचे उमेदवार गमलीएल हेमब्रम यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर तीन मोठे आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात वय वाढवून सांगितलं असल्याचा पहिला आरोप आहे. हेमंत सोरेन यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे वय 42 वर्षे असल्याचे घोषित केले होते आणि 24 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांचे वय 49 वर्षे असल्याचे घोषित केले आहे.
भाजपचे उमेदवार गमलीएल हेमब्रम यांनी सोरेन यांची जमीन आणि पत्नीच्या कार बद्दल ही तक्रार केली आहे. 2019 मध्ये हेमंत सोरेन यांनी उमेदवारी अर्जात फक्त दोन जमिनींचा उल्लेख केला होता. वरील दोन्ही जमिनी 2006 ते 2008 दरम्यान खरेदी केल्या होत्या. 2024 मध्ये 23 भूखंडांचा उल्लेख करण्यात आला होता. हे भूखंड 2006 ते 2008 मधील आहेत. अशा परिस्थितीत याआधी 23 भूखंड खरेदी करण्यात आले असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ही घोषणा का करण्यात आली नाही, असा दुसरा आरोप केला आहे.
हेमंत सोरेन यांनी 2019 च्या निवडणुकीत बोकारोच्या जरिडीह स्थित असलेल्या 43560 चौरस फूट जमिनीची खरेदी किंमत 10,00,000 रुपये घोषित केली होती. 2024 मध्ये त्याचे मूल्य 4,45,000 रुपये दाखवले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये जमीन खरेदीची तारीख 24 नोव्हेंबर 2006 आहे. अखेर आता भाव कसे कमी झाले? असा प्रश्न उपस्थित करत तिसरा आरोप करण्यात आला आहे.
'हेमंत सोरेन यांनी बऱ्हेतच्या जनतेचा विश्वासघात केला'
'हेमंत सोरेन यांनी सत्ता मिळविण्यासाठी बरहेत मतदारसंघातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशी टीका हेमब्रम यांनी केली आहे. या मतदारसंघातील त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी हेमब्रम म्हणाल्या की "ही निवडणूक केवळ माझी लढाई नाही, तर या मतदारसंघातील लोकांची लढाई आहे. या विधानसभा मतदारसंघांतर्गत 618 गावे आहेत आणि त्यापैकी 10% गावांनाही भेट दिली तर मग शिक्षण, आरोग्यसेवा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विकासाचा तुम्ही अंदाज लावू शकता असं म्हटलं आहे.
प्रत्येक निवडणुकीत खोटी आश्वासने आणि आश्वासन देऊन "बऱ्हाटच्या साध्या जनतेची" फसवणूक केल्याचा आरोप हेम्ब्रेम यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. सोरेन यांनी धनुष्यबाण यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक चिन्हांचा वापर केला आणि सत्ता मिळवण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्कृती आणि भाषेचा वारंवार फायदा घेतला, असा दावा त्यांनी केला आहे.












Click it and Unblock the Notifications